Home मराठवाडा पोलीसांना होमिओपॅथीक औषधांचे वाटप

पोलीसांना होमिओपॅथीक औषधांचे वाटप

118

शहर प्रतिनिधी – गौरव बुट्टे

जालना – जालना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुशी लढणार्या दोन हजार योध्याना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आपली प्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी श्रध्दा होमीयो क्लिनिक कडून पोलिस अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी श्री जी.एम वायाळ यांच्या कडे होमिओपॅथीक औषधे सुपूर्द करण्यात आली .

यावेळी डाॅ.एस.के मोरे , श्री पी. एन.जर्हाड ( ऐ.एस.आय.) तसेच, पोलिस कान्सटेबल श्री संजय सोनुणे व सतीश नरवडे उपस्थित होते.