Home विदर्भ प्रतिसाद फाउंडेशन चे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी – पालकमंत्री ना. संजय भाऊ राठोड

प्रतिसाद फाउंडेशन चे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी – पालकमंत्री ना. संजय भाऊ राठोड

263

यवतमाळ , दि. ०८ :- सध्या संपूर्ण देश कोरोना सारख्या महाभयंकर आजाराशी संघर्ष करत आहे. या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नाही.

त्यामुळे या आजारावर मात करण्यासाठी शासनाला लॉक डाऊन सारखा निर्णय घ्यावा लागला. याचा फटका श्रीमंता पासून तर गरिबांपर्यंत सर्वांचं सहन करावा लागत आहे. विशेषतः जे लोक भिक्षा मागून दोन वेळच पोट भरतात अशांना आणि मनोरुग्ण असलेल्यांना लॉक डाऊन च्या काळात हाल सहन करण्याची वेळ आली. मात्र अशा परिस्थितीत प्रतिसाद फाउंडेशन ने पुढाकार घेऊन या लोकांना दिलासा दिला. अन्नदानाच्या माध्यमातून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ दिली नाही. प्रतिसाद फाउंडेशन चे हे कार्य जिवंत माणुसकीच उदाहरणं असून समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन वन मंत्री ना. संजय राठोड यांनी केले.ते प्रतिसाद फाउंडेशन च्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, आणि राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.

प्रतिसाद फाउंडेशन हे गेल्या 5 वर्षा पासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. कोरोनाच्या काळात लॉक डाऊन ची घोषणा झाल्या नंतर ते शहरातील मनोरुग्ण , भिक्षा मागणाऱ्या लोकांना अन्नदान करत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पालक मंत्री ना. संजय भाऊ राठोड यांनी प्रतिसाद फाउंडेशन च्या कार्यालयाला भेट दिली. प्रतिसाद चे अध्यक्ष मनोज गुल्हाने आणि सचिव सचिन कावरे यांनी यावेळी मंत्री महोदयांना फाउंडेशन च्या कामाची माहिती दिली .
यावेळी पालकमंत्री ना संजय राठोड यांनी प्रतिसाद फॉउंडेशन च्या कामाचे तोंड भरून कौतुक केले.