Home विदर्भ भारतीय नारी रक्षा संघटनेकडुन मास्क वाटप

भारतीय नारी रक्षा संघटनेकडुन मास्क वाटप

257

बुध्द जयंतीचे औचित्य साधुन जामनकर नगरात मास्कचे वाटप

यवतमाळ , दि. ७ :- कोरोणा विषाणुच्या दिवसेंदिवस वाढत्या प्रादृभावाने संपुर्ण भारतात लाॅकडाऊन करण्यात आला असुन सर्वत्र संचारबंदी लागु करण्यात आली आहे.मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत समाज बांधवांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात राहुन साजरी करत एक आदर्श निर्माण केला.

त्यासोबत दि.७ मे रोजी संपुर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या आदेशाचे पालन करित भारतीय नारी संघटनेच्या वतिने मास्क व सॅनीटाझरचे वाटप करण्यात आले.मास्क वाटप करतांना भारतीय नारी रक्षा संघटनेचे सचिव सुकांत वंजारी यांनी माहिती देतांना सांगितले कि,जर कोरोना विषाणुचा विरोधात लढायचे असल्यास सर्वांनी घरात राहुनच दक्षता घ्यावी व सामाजिक अंतर ठेवून प्रशासनाच्या सुचनेचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.भारतीय नारी रक्षा संघटनेच्या अरुणा वंजारी यांच्या हस्ते मास्कचे वाटप करतांना साक्षी तोडेकर , सोनाली खोब्रागडे,नंदा वंजारी , तुळसाबाई तोडेकर,वैशाली खोब्रागडे, प्रभाबाई वंजारी , भारतीबाई पाईकराव,गायत्रीबाई खोब्रागडे,अरुणा वाळके,सिमाबाई आगलावे , योगीता वाणी,रंजना तोडेकर,लक्ष्मी खोंडे,शिलाबाई आगलावे,वैजयंती वंजारी,उज्वला मानवतकर,अंजनाबाई मानवतकर , संजिवनी वंजारी,दिक्षा तोडेकर,चैत्या तोडेकर,संदेश वंजारी,सुबोध वंजारी,धिमंत ढाकणे,यश आगलावे,विर खोंडे,सिध्दांत वंजारी,आरोही वंजारी,आर्या वंजारी आदी उपस्थित होते.