Home जळगाव ईद सण होई पर्यंत सर्व मार्केट बंद करावे…..

ईद सण होई पर्यंत सर्व मार्केट बंद करावे…..

149

मुस्लीम एक्शन कमेटी मुक्ताईनगर तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले …

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे मुस्लीम एक्शन कमेटी मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार साहेब याना निवेदन देण्यात आले की,देशात कोरोना विषाणू COVID19 चे आढळयाने संपुर्ण देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना चे प्रादुर्भाव वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावत आहे.तरी मुक्ताईनगर येथील मुस्लीम एक्शन कमिटी व सर्व मुस्लीम समाज ने मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन द्वारे मागणी करत आहे की,पवित्र रमजान महिना चालू असुन लॉक डाऊन मध्ये काही शहरात छूट देन्यात आली आहेत.व त्यामुळे कोरोना वायरस मुळे रोग वाढु शकतो.तरी रमजान ईद होई पर्यंत लाॅक डाउन ची अमलबजावणी व्हावी व संपुर्ण मार्केट बंद ठेवावे.तसेच संपुर्ण मुस्लीम समाज ईद ची खरेदी ना करता ते पैशाचे वापर गरीब गरजू लोकांची मदत करुण ईद साजरी करण्याचे निर्णय मुस्लीम एक्शन कमिटी ने घेतला आहेत.तसेच ईद ची शाॅपिंग न करता ते पैसे चा वापर गरजवंत लोकांना मदत म्हणून करावे, व ईद ची शाॅपिंग न करता ईद अतिशय साध्या पद्धतीने ईद सण साजरा करण्यात यावे.अशा निर्णय घेण्यात आला.तसेच महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री मा.ना.श्री उध्दव ठाकरे साहेबांचा चा हि अभिनंदन करण्यात आले व मा.मुख्यमंत्री सहायता निधीला ही मद्दत करण्यात आली, मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन देताना शिवसेना जिल्हा अल्पसंख्याकं संघटक अफसर खान,मनियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी,सुन्नी मनियार मस्जिद चे मुतवल्ली कलीम मनियार,समाजिक कार्यकर्ते मुख्तार खान,समाजिक कार्यकर्ता आसिफ शेख उस्मान, शेख अहमद ठेकेदार,समाजिक कार्यकर्ता शेख मजिद बागवान,रिजवान चौधरी अदि उपस्थित होते..