Home रायगड मावळच्या खासदारांचा कर्जत तालुक्यात “माणुसकीचा धर्म “मावळला!शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…!

मावळच्या खासदारांचा कर्जत तालुक्यात “माणुसकीचा धर्म “मावळला!शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…!

167

कर्जत – जयेश जाधव

देशात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे याची सर्वात जास्त झळ मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदार क्षेत्रात बसली आहे. कर्जत तालुक्यात बहुसंख्य आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो.मात्र या आदिवासी भागात खासदार आप्पा बारणे यांनी पाठ फिरवली आहे . एवढेच काय या लाॅकडाऊन परिस्थितीत त्याच्या पोटाची खळगी भरायला किंवा साधे जीवनावश्यक वस्तूंचे किट देखील देण्यास खासदारांचे हात तोकडे पडले ही मोठी दुर्दैवाची गोष्ट! खासदार आपल्या भाषणात नेहमीच म्हणतात मी एकमेव टॅक्स भरणारा खासदार आहे मग आता कुठे तुम्ही हरवालात?!. अशी चर्चा सुरू आहे . त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नाराज आहे
कर्जत- खालापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.तेव्हा येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदारांना विसर पडला! कर्जत विधानसभेत शिवसेनेचे प्राबल्य असताना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांना यांना देखील फोन करून परिस्थितीचा आढावा घेता आला नाही? जे निष्ठावंत कार्यकर्ते शिवसैनिक रात्रंदिवस मेहनत घेऊन काम करीत होते त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे??? यांचा विसर पडला आहे. त्यामुळे माणुसकीचा धर्माचा विसर पडला???याची आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे८०टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या ब्रीद वाक्याचा खासदारांना विसर पडला आहे त्यामुळे असंवेदनशील खासदारांबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील दोन भाग आहेत एक वरचा आणि दुसरा खालचा या खालच्या भागात कोकणी माणूस कोकणी माणूस प्रेमळ व माणुसकीचा धर्म पाळतात तर वरचा भाग (घाटमाथ्यावर )असणारा माणूस हा सुध्दबुध्दीने घाणेरडे राजकारण करणारा असतो अशी प्रतिक्रिया जनमाणसांत होत आहे
आजही कोरोनासारख्या आजारांवर मात करण्यासाठी कर्जत मतदारसंघातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी माणुसकीचा धर्म पाळत मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात हातभार लावत आहे कारण ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करीत आहेत.जनता जनार्दन भोळी भाबडी जरी असली तरीही भविष्यात पुढील पाच वर्षांत मतांचा जोगवा मागण्याची वेळ येणार आहे का?अशी संतापाची भावना तेथील आदिवासी वाडीतील नागरिक करीत आहे खासदार श्रीरंग बारणे हे आज कर्जत प्रांत कार्यालयात भेट देण्यासाठी आले असताना त्यानी याबाबत पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते याना कुठलीही कल्पना दिली नव्हती.कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या विश्वासात न घेता ते प्रांत कार्यालयात भेट दिली. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक, लोकप्रतिनिधी यांनी नाराजी व्यक्त केली.याशिवाय चले जाव खासदार!तुम कुछ काम के नही है!अशी दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे.