
विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे
लातूरात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज परत एकदा उदगीर मध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता उदगीर मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३ वर गेली आहे. यापुर्वी ८ कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारा नंतर बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर पाच जणांवर उदगीर च्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.











































