Home सोलापुर बोरगांव दे. ग्रामपंचायत च्या वतीने नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग

बोरगांव दे. ग्रामपंचायत च्या वतीने नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग

123

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विलासराव सुरवसे व ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामदागी यांच्या पुढाकाराने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग द्वारे तपासणी करण्यास सुरुवात झाली.

याद्वारे शरीरातील तापमानाचे प्रमाण समजते. लक्षणे जाणवणारी संभाव्य व्यक्ती शोधणे व नागरिकांच्या मनातील भीती दूर करणे या हेतूने ही तपासणी केली जात आहे. अशा पद्धतीने तपासणी करणारी बोरगाव दे. ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. अशी भावना नागरीकातून व्यक्त होत आहे.सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बोरगांव ग्रा प वतीने नागरिकाचे तापमान समजुन घेण्याचा काम सुरू आहे.