Home मराठवाडा कोरोनाच्या वैश्विक संकटात गरिबांच्या मदतीसाठी ब्रिज ऑफ होप या संस्थेने उचलला मदतीचा...

कोरोनाच्या वैश्विक संकटात गरिबांच्या मदतीसाठी ब्रिज ऑफ होप या संस्थेने उचलला मदतीचा खारीचा वाटा

109

रविंद्र गायकवाड – बिडकिन

औरंगाबाद – कोरोनाच्या भयावय संकटात व देशात,राज्यात लॉकडाऊन मुळे राज्यातील मजदुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे.
अश्या परिस्थितीत चितेगाव,बिडकीन येथील गरजवंताना ब्रिज ऑफ होप या संस्थेच्या वतीने राशन किट वाटप ,व मास्क, तसेच डेटॉल साबण वाटप करून मदतीचा हात समोर केला.
केंद्रशासनाच्या लॉकडाऊन अंतर्गत राज्यबंदीचे आदेश ३ मे पर्यंत निर्गमित केले आहेत . त्यामुळे हातावर पोट आसणा – या अनेक गोरगरीब जनतेच्या घरात खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोनामुळे सर्वत्र कामधंदे बंद पडल्यामुळे खायचे काय ? हा प्रश्न गोरगरीब जनतेसमोर उभा टाकला आहे.
कोरोना विषाणुने देशासह अनेक राज्यात थैमान घातले आहे, त्यामुळे लॉकडाऊन संचारबंदी लागु आहे.
सविस्तर माहिती:
अश्या भयावय परिस्थितीत जगासमोर असलेले वैश्विक महामारी कोरोना संकट परिस्थितीत चितेगाव परिसरात असलेले ब्रिज ऑफ होप ही संस्था नियमितपणे गरिबांसाठी मदतीचा हात सरसावते.
आज दिनांक 26 एप्रिल रोजी चितेगाव , बिडकीन परिसरात असलेले गरीब व गरजू कामगारांना एकूण विस हुन अधिक कुटुंबाला ब्रिज ऑफ होप शाखा चितेगाव या संस्थेच्या वतीन बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे सर यांच्या हातून गोर-गरीबाना राशन किट व मास्क,तसेच डेटॉल साबण चे वाटप करण्यात आले.
ब्रिज ऑफ होप शाखा चितेगाव येथील सर्व स्टाफ समाजाप्रति भावना अतिशय जपत असल्याची कबुली संस्थेचे प्रदेश प्रभारी जयेश परमार असे बोलत होते व सर्व स्टाफ चे कौतुक केले. हा उपक्रम प्रदेश प्रभारी श्री जयेश परमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला व ब्रिज ऑफ होप शाखा चितेगाव येथील शाखा प्रबंधक विनोद भालेराव, समाजसेवक रविंद्र मावस समेत सर्व स्टाफ व समाजसेवक रमेशजी शिंदे, पत्रकार रविंद्र गायकवाड,पत्रकार सौद अल जिलानी यांनी विशेष काळजी व सहयोग नोंदवला .