Home महत्वाची बातमी अवेध गुटख्याची वाहतूक करतांना एकास अटक एक फरार ,

अवेध गुटख्याची वाहतूक करतांना एकास अटक एक फरार ,

73
0

बदनापूर पोलिसांची कामगिरी

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

लॉक डाऊन असतांना चिखली -दाभाडी रस्त्यावरून एका शिफ्ट कार मध्ये ताबाखूयुक्त गुटका वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांना मिळल्याबे सदर रस्त्यावर सापडा रचून वाहनांची तपासणी केली असता गोवा गुटखा आढळून आल्याने 6 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
जालना जिल्ह्यतील राजूर येथून लॉक डाऊन असतांना एका शिफ्ट डिझायर कार मध्ये गोवा गुटख्याची वाहतूक बदनापूर हद्दीत केली जात असल्याची गोपनीय माहिती खबर्यामार्फत बदनापूर पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांना मिळाली असता त्यांनी दाभाडी बीट पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण यांना सूचना देऊन सदर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले असता अनिल चव्हाण यांनी चिखली दाभाडी रस्त्यावर राजूर कडून येणारी स्विफ्ट कार एम एच 06ए झेड 9954 यास थांबवून विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनांची दिक्की तपासली असता त्यामध्ये तंबाखूयुक्त गुटका आढळून आल्याने बदनापूर पोलीस ठाण्यात आणले असता सदर गुटखा राजूर येथून घेतल्याचे सांगितल्याने एम बी खेडकर यांनी राजूर येथे जाऊन शोध घेतला व आरोपी निसार अनिस सिद्दीकी रा भोकरदन व संदीप भूमकर रा राजूर विरुद्ध गुन्हा दाखल करून 2 लाख 80 हजराचा गुटखा व कार 4 लाख असा 6 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर ची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे