July 14, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

प्रिंट मिडियातील संगणक चालकही अडचणीत , “पडद्यामागचे हिरो”

लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आज चरखातील ऊसाप्रमाणे पिळून निघावे लागत आहे . प्रत्येक जण आर्थिक अडचणीत सापडला आहे.नाटक, सिनेमा,तमाशा कलावंतांबरोबरच पार्श्वगायक, संगितकार,निर्माता, दिग्दर्शकांबरोबरच प्रिंटमिडियातील पडद्यामागचे हिरो संगणक चालक जे कि बातमीला रंगरूप देतात आज त्यांच्यापुढेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. दैनिक , साप्ताहिक,मासिक वृत्तपत्रांना आकर्षक रित्या सजविणाऱ्या संगणक चालकांना मिळणारा पगार आणि त्यावर त्यांच्या कुटुंबीयांना गरजा पुरविताना होणारी कसरत विदारक आहे.लाॅकडाउनच्या काळात वृत्तपत्रीय छपाई, वितरण बंद पडल्यानंतर संगणक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.सद्याच्या परिस्थितीमुळे संगणक चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हि बाब गांभीर्याने विचारात घेऊन संगणक चालकांना निश्चितपणे आर्थिक मदत दिली पाहिजे.अशी मागणी जोर धरत आहे. प्रिंटमिडियाच्या कार्यालयांमध्ये पडद्यामागून पानावरिल प्रत्येक बातमीला रंगरूप, लेआऊट, सजावट देण्याबरोबरच प्रत्येक शब्दन् शब्द अचूक टाईप करणे अशी कामे संगणक चालक करत असतात. मात्र वृत्तपत्रीय क्षेत्रातील हा पडद्यामागचा हिरो नेहमीच वंचित राहिला आहे.पडद्यामागचे हिरो असल्याने संगणक चालकांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाउन जाहीर केल्यामुळे पडद्यामागच्या हिरोंवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य व्यवसाय बंद असल्याने घरातच आहेत. कुटुंबाचा सर्व भार संगणक चालकांवर पडलेला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आज सर्व आपापल्या घरात सुरक्षित असताना संगणक चालक मात्र आॅनड्यूटी आहेत.

लाॅकडाउनच्या काळात काही वृतमानपत्रांची छपाई होत नसली तरी आॅनलाईन वृतपत्रांनाही तेवढीच मागणी आहे.आॅनलाईन कामातही संगणक चालकांची महत्त्वाची भूमिका असते.वृतपत्रीय क्षेत्रातील संगणक चालक या पडद्यामागच्या हिरोंवर आज आर्थिक अडचणीचे संकट कोसळले आहे.राजकिय, सामाजिक क्षेत्रातील सामान्य माणसाला ज्यांनी रंगरूप, सजावट देवून मोठं केलं…..‌ त्यांच्या प्रामाणिकपणाची आज खऱ्याअर्थाने कसोटी आहे. समाजातील दानशूर तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे , अशी मागणी होवू लागली आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!