Home मुंबई शिधावाटप दुकानातील गैर कारभारावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारावर तक्रार मागे घेण्यासाठी अधिकारी दबाव...

शिधावाटप दुकानातील गैर कारभारावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारावर तक्रार मागे घेण्यासाठी अधिकारी दबाव टाकीत आहेत.

491

सुरेश वाघमारे

मुंबई – मालाड पश्चिम, राठोडी व्हिलेज, नीलिमा को.ऑप.सोसा.मधील शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ या दुकानात मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची तक्रार कार्ड धारकांकडून करण्यात येत आहे. तसेच
१) अनेक वेळा दुकान बंद ठेवण्यात येते
२) कार्ड धारकांना अन्नधान्य देण्यात येत नाही,
३) दुकानाचा फलक दर्शनी भागात नाही,
४) अन्नधान्य घेतल्यानंतर दुकानदार त्याची पावती देत नाही,
५) कार्ड धारकांना मोफत मिळणारे तांदूळ मिळत नसल्याच्या तक्रारी दुकानदाराच्या तक्रार वहिमध्ये काही कार्ड धारकांनी केली आहे.
लॉकडाऊन अश्या प्रकारे नागरिकांची फसवणूक करीत काळाबाजार करणाऱ्या दुकानदारावर त्वरित कारवाई करून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे ट्विटरद्वारे तक्रार करून केली आहे.
याबाबत दि.२२ एप्रिल रोजी पोलिसवाला ऑनलाईन मीडिया मध्ये बातमी प्रसिध्द होताच प्रशासन जागे झाले व शिधावाटप कार्यालय ४२ ग मधील शिधावाटप निरीक्षक अभिजीत बोरोडे यांना याबाबत कारवाई करण्यासाठी पाठविले परंतु बोरोडे हे काळाबाजार करणाऱ्या दुकान दारावर कारवाई करण्या ऐवजी याबाबत तक्रार करणाऱ्या सुरेश वाघमारे यांना फोन करून तक्रार मागे घेण्यासाठी सांगतात. वाघमारे यांनी तक्रार मागे घेण्याचे नाकारले असता त्यांना दुकानावर बोलावून ” तुम्ही तुमच बघा, मी दुकानदाराला तुम्हाला रेशन देण्याचे सांगतो” असे बोरोडे यांनी वाघमारे याना सांगितले, परंतु माझ्या सारख्या अनेक लोकांना रेशन मिळत नाही तरी आपण याबाबत ह्या काळाबाजार करणाऱ्या दुकांदारवर कारवाई करा अशी विनंती वाघमारे यांनी केली पण बोरोडे बोलले कि तुम्ही लोकांचं नका सांगू तुमचं बघा मात्र वाघमारेंनी सर्वांचं रेशन द्या तेंव्हाच मी घेईल आणि आपल्या आपल्या कामात कसूर करत लोकांना वेठीस धरणाऱ्या रेशन नाकारणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई करा पण बोरोडे काही ऐकायला तयार नव्हते तर वाघमारे यांना वारंवार तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत होते. वाघमारे यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिला तेव्हा बोरोडे मानले आम्ही बघू काय करायचे ते, एवढं बोलून बोरोडे यांनी वाघमारे याना दुकानातून जाण्यास सांगितले.

अश्या प्रकारे गैरकारभा करणाऱ्या शिधावाटप दुकांनदारावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार यांच्यावर दबाव आणणाऱ्या भ्रष्ट व कामचुकार शिधावाटप निरीक्षक बोरोडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फाईट फॉर राईट फाउंडेशन चे अध्यक विनोद घोलप यांनी केली आहे. तसेच वरील दुकानदार याची सुद्धा चौकशी वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फ़त करण्यात यावी व नागरिकांना या दुकानातुन त्यांच्या हक्काचे अन्न धान्य मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने त्वरित करावी असे घोलप यांचे म्हणणे आहे.