Home मराठवाडा नागरिकांनी नियमांचे पालन करावे मुख्याधिकारी विद्या कदम

नागरिकांनी नियमांचे पालन करावे मुख्याधिकारी विद्या कदम

148

मजहर शेख

सावधान माहूर नगर पंचायत ने शहरात तीन जागी उभारली नाके

तपासणी सुरु….विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल…

नांदेड/माहूर , दि. २२ :- कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संपुर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन घोषीत करून सर्वत्र संचार बंदी लागू केली आहे.जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी केलेल्या नियोजनाला अनुसरून संबंधीत विभागाने विशेष खबरदारी घेतल्याने आज पावेतो नांदेड जिल्ह्यात एकही कोरोना युक्त रुग्ण आढळला नसल्याने हा जिल्ह्या ग्रिन झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. नियमात काही अंशी शिथिलताही देण्यात आली होती, परंतु नांदेड शहरातील पीर बुरान नगर मधील रहिवाशास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच जिल्ह्याधिका-यांनी नव्याने आदेश निर्गमित केल्याने माहूर नगर पंचायत प्रशासनाने नियमांची कडक अमल बजावणी करण्यास सुरुवात केली असून नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिला आहे.
नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याचे कळताच मुख्याधिकारी विद्या कदम,पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख व त्यांच्या अधीनस्थ कर्मचा-यासह न.पं.चे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी ,गंगाधर दळवी,सुनील वाघ ,देविदास जोदळे,विजय शिंदे यांनी शिवाजी चोक परिसरात जमाव बंदीचे उल्लंघन,मास्क न लावलेल्या व तोंडाला रुमाल न बांधलेल्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांचे कडून दंड वसूल केला असून उघडण्यात आलेली सर्वच दुकाने बंद करून दिलेल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे.
दुपारी 1 नंतर शहरातील मेडिकल व रुग्णालय वगळता इतर सर्व प्रतिष्ठिने बंद राहतील, या नियमाचे कोणीही उल्लंघन करणार नाही. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिला.