Home सातारा लॉक डाऊन काळात बँक ऑफ इंडिया मायणी तिचे काम आदर्शवत

लॉक डाऊन काळात बँक ऑफ इंडिया मायणी तिचे काम आदर्शवत

120

मायणी ता. खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे) – सध्या संपूर्ण जगात कोरोणाने थैमान घातले आहे यावर घरी राहणे व सोशल डिस्टन्स पाळने हाच पर्याय आहे तसेच सध्या ग्रामस्थां यांच्या जनधन खात्यात व पंतप्रधान किसान योजनेत पैसे जमा झाल्याने ग्रामस्थ बँकेसमोर गर्दी करून सोशल डिस्टन्स फज्जाउडवत आहेत याला अपवाद ठरली आहे बँक ऑफ इंडिया शाखा मायणी बँकेचे एजंट कर्मचारी ग्राहकांना सोशल डिस्टन्स उभे करतात त्यांच्या हातात टोकन दिले जाते व एका वेळेला एकच आत सोडले जातात त्यामुळे सकाळी येणाऱ्या ग्राहकाला लवकर नंबर मिळतो फक्त पैसे काढण्यासाठी उभारण्यासाठी ही रांग असून पैसे ट्रान्सफर व इतर कामासाठी ग्राहकांना थेट बँकेत जाता येते ऐज बँकेने घेतलेली जबाबदारी खरोखर आदर्शवत आहे याशिवाय पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी या बँकेतून पैसे पाठवण्याची सोय करण्यात आली आहे पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी स्वतंत्र काउंटर केले असून कोणत्याही ग्राहकाला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही खातेदारांनी या गंभीर काळात जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आव्हान बँकेचे शाखाप्रमुख दीपक इक्का व प्रमुख सौरभ त्रीपाठी एजंट शिवाजी कणसे, जगन्नाथ भिसे यांनी केले आहे.