Home विदर्भ दर्यापूर दर्पण कार्यालयाचे आ. श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न…!

दर्यापूर दर्पण कार्यालयाचे आ. श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न…!

386

अमरावती / दर्यापुर – अल्प कालावधीत संपूर्ण विदर्भातील वाचकाच्या पसंतीस उतरलेल्या जनसामान्यांच्या बुलंद आवाज साप्ताहिक दर्यापूर दर्पणच्या कार्यालयाचे उदघाटन राज्यमंत्री दर्जा प्राप्त अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत दादा देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. सुरुवातीला फीत कापून उदघाटन करण्यात आले दर्यापूर दर्पण या वृतपत्राची प्रगती होऊन हे वृत्तपत्र दैनिक व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर वृतपत्राचे मुख्य संपादक अमोल कंटाळे यांच्या हस्ते आमदार श्रीकांत देशपांडे यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना शहरप्रमुख रवींद्र गणोरकर, जिल्हा परिषद शिक्षक बँक संचालक मधुकर चव्हाण व सुधीर केने ,माजी तहसीलदार मनोहर चव्हाण,जेष्ट पत्रकार गजानन देशमुख, क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ,सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील अरबट , माजी नगरसेवक शिवाजी देशमुख , शिक्षक आघाडीचे दर्यापूर शहर अध्यक्ष तुषार बायस्कार,आमदार श्रीकांत देशपांडे यांचे स्वीय सहाय्यक रविंद्र सोळंके ,शिक्षक आघाडी दर्यापूरचे मार्गदर्शक व कार्याध्यक्ष मनोज देशमुख, दर्यापूर दर्पण चे मुख्य संपादक अमोल कंटाळे,संपादक निलेश पारडे, जाहिरात व्यवस्थापक रवी नवलकार, दर्यापूर तालुका प्रतिनिधी धनंजय देशमुख, येवदा येथील प्रतिनिधि चेतन रोकड़े,सौरभ रहाटे,सह वृतपत्राचे प्रतिनिधि उपस्थित होते,साप्ताहिक दर्यापूर दर्पणच्या पुढील वाटचालीला मान्यवर मंडळींनी शुभेच्छा दिल्या. सोशल डीदास्टिंगचे पालन करून हा छोटासा कार्यालय उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.