Home सातारा मायणी कर सावधान गावामध्ये ड्रोन कॅमेरा ने गावामध्ये शूटिंग चालू

मायणी कर सावधान गावामध्ये ड्रोन कॅमेरा ने गावामध्ये शूटिंग चालू

211

सतीश डोंगरे – मायणी

सातारा – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मायणीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस ड्रोनद्वारे करडी नजर ठेवत आहेत. ड्रोन पोलीस उडवणार आहेत. ड्रोन उडवून मायणी पोलिसांनी नागिराकंना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले.

मायणी सारख्या परिसरातील लोक प्रशासनाचे ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. कारण अनेक वेळा पोलिसांनी लोकांना घरी राहा, अत्यावश्यक सेवेशी निगडित काही काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले. तसेच वेळ पडली तर दंडुकेशाहीचाही उपयोग केला. परंतु मायणीत मध्ये काही लोक अजूनही सुधारत नाहीत. त्यामुळे आता मायणी पोलिसांनी अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी थेट ड्रोनचा उपयोग केला.मायणी भागातील गल्लीबोळात जी लोक बाहेर येतात किंवा इमारतीच्या गच्चीवर गर्दी करतात, अशा लोकांवर खासकरून नजर ठेवण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होत आहे. त्यात लोकांनाही या ड्रोनची भीती आहे. त्यामुळे ड्रोनची नजर तर आपल्यावर नाही ना या शंकेमुळे लोक घराच्या बाहेर पडताना दिसत नाहीत.मायणी कर गावामध्ये ड्रोन कॅमेरा ने गावामध्ये शूटिंग करण्यात येणार आहे. सावधान गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने बंद ठेवावी. जर एखादे दुकान ड्रोण कॅमेराला चालू दिसले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यानी ही घराबाहेर फिरू नये.
पोलिस दुरक्षेत्र मायणी
पोलीस पाटील मायणी.यांनी असे आव्हान केले