Home मराठवाडा बिबट्या मृत्यु प्रकरणी प्रथम वन गुन्ह्याबाबत तिन संशयित आरोपींना अटक , “एक दिवसाची...

बिबट्या मृत्यु प्रकरणी प्रथम वन गुन्ह्याबाबत तिन संशयित आरोपींना अटक , “एक दिवसाची वन कोठडी”

189

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १९ :- झळकवाडी येथिल दोन बिबट्या मृत्यु प्रकरणी भारतिय वन्यजिव संरक्षण अधिनियमाखाली ३ व्यक्तींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश जाधव यांनी एका दिवसाची वन कोठडी सुनावली असुन त्या बिबट्या मृत्यु प्रकरणाचे धागे दोरे हाती लागणार आहेत. आणखी एका बिबट्याचा संचार असल्याच्या चर्चेने वन विकास महामंडळाच्या कर्मचा-यांनी हा परिसर पिंजुन काढला आहे तर त्या बिबट्याचा शोध सुरु आहे.

झळकवाडी येथिल दोन बिबट्या मृत्यु प्रकरणी प्रथम वन गुन्ह्या बाबत तिन संशयित आरोपींना अटक केली असुन रामजी नामदेव बर्गे वय ३० वर्षे रा.झळकवाडी, प्रदिप गोवर्धन राठोड वय २३ वर्षे रा. तल्हारी तांडा, गोवर्धन रुपसिंग राठोड वय ५० वर्षे रा. तल्हारी तांडा ता.किनवट जि.नांदेड यांना वन विकास महामंडळने अटक करुन भारतीय वन्यजिव १९७२ चे कलम २(१६), ९,३९,५१, व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ६६ नुसार प्रथम वन गुन्हा क्रमांक १/७३३/२०२० दिनांक १७-४-२०२० गुन्हा दाखल करुन आज किनवट न्यायालया समोर हजर केले असता न्यायाधिस जाधव यांनी एका दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. वन कोठडीत आरोपी कडून बिबट्याच्या मृत्यु प्रकरणी उलगडा होणार आहे त्या नंतरच त्यांच्या मृत्युचे कारण समोर येणार आहे हि महत्वपुर्ण कारवाई एस.एच वाजे विभागिय व्यवस्थापक वन प्रकल्प किनवट , जे.डी पराड सहाय्यक व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शना खाली वन परिक्षेत्र अधिकारी एम डी गिते, वनपाल एन.ए गावंडे, वनरक्षक एम.के पेंदे यांनी केली असुन या प्रकरणी शोध सुरु आहे.

त्या बिबट्याच्या शवा जवळ एका कुत्र्याचे शव आढळुन आले आहे त्या कुत्र्याचे व बिबट्याच्या शवाचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी वि.एल बिराजदार डॉ अजय शिवनकर, डॉ ओमप्रकाश शिंदे व डॉ मिरासे यानी मृत कुत्र्याचे व बिबट्याच्या मांसाचे नमुने सिलबंद करुन मृत्युचे कारण तपासणी करीता पाठवले आहे.