Home जळगाव मनियार बिरादरी चा असाही अनोखा विवाह सोहळा

मनियार बिरादरी चा असाही अनोखा विवाह सोहळा

517

जेवनावळी-दहेज(भांडी)-बिदागिरी ला फाटा
लॉक डाऊनमुळे का होईना इस्लामी रितीरिवाजानुसार लग्न पार पडले – मुफ़्ती अतीकुर्रहमान

रावेर (शरीफ शेख)

जळगाव शहरात जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ने लॉक डाऊन च्या काळात नियोजित लग्न रद्द न करता त्यात सर्व रीतिरिवाज यांना फाटा देत अत्यंत साध्या व बिनखर्चिक पद्धतीचे लग्न करून समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत जिल्हा प्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष मनियार बिरादरी फारुक शेख यांनी व्यक्त केला.
वधू -वर यांच्या आई वडील व नातेवाईकांचे आभार व्यक्त करून त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल बिरादरी ही आपली ऋणी राहील अशा भावना व्यक्त केल्या व उपस्थित वर वधूंना आशीर्वाद दिले.
तत्पूर्वी मुफ़्ती अतीकुर्रहमान यांनी खुतब ए निकाह पठण केला व दुवा केली की अल्ला या कोरोनाव्हायरस चा संपूर्ण जगातून खात्मा कर व विश्व मध्ये शांतता नांदो.
आजचा विवाह जरी साडे चौदाशे वर्षांपूर्वी सांगितलेल्या अंतिम प्रेषित त्यांच्या तत्त्वानुसार होत असले तरी त्याला कारण आहे लॉक डाउन चे लॉक डाउन मुळे का होईना जर आम्ही आमच्या निसर्गाने व प्रेषितांनी ठरवलेल्या जीवन चरित्र याप्रमाणे जऱ आम्ही आपले जीवन व्यतीत केले तर निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण मानव जातीला होईल असे सुद्धा त्यांनी नमूद केले.

वर- वधू व नातेवाईकांचा सहभाग

वधू सुमय्या बी, वर जाकीर हुसेन जळगाव या दोघांचा निकाहा चे वकील म्हणून वधूचे मावसा शेख सलीम शेख रशीद तर साक्षीदार म्हणून वराचे तर्फे शेख इरफान अब्दुल रज्जाक व अब्दुल रउफ अब्दुल रहीम हे होते.
खुतब ए निकाह जळगाव शहराचे काजी मुफ़्ती अतिकउर रहमान यांनी पढविले.
सदरचा विवाह हा संपूर्णपणे सामाजिक अंतर व मास लावून करण्यात आला.

*यांची होती उपस्थिती*
मनियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख, सचिव अब्दुल अजीज, उपाध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर, संचालक सलीम मोहम्मद ,हारून शेख, अल्ताफ शेख तसेच वधु तर्फे वडील शेख समद शेख हमीद, आई सईदा बी शेख समद, मामा शेख अमान व जाफर हाजी, शेख बिसमिल्लाह, तर वरा तर्फे वडील शेख यूसुफ हुसेन, आई मुनीरा बी शेख यूसुफ, भाऊ अली अशरफ,मामा बिस्मिल्लाह गनी यांची उपस्थिती होती.
लग्न लागताच त्वरित वधूला निरोप देण्यात आला कोणत्याही प्रकारचे जेवणावळी अथवा दहेज या गोष्टीला फाटा देण्यात आला होता. सदर लग्नामुळे बिरादरीचे कौतुक मुफ़्ती अतिकुर रहमान यांनी केले असून सामान्य जीवनात सुद्धा अशाच प्रकारचे विवाह होणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.