July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मुंडगाव आरोग्य वर्धिनी केंद्रातुन मुदतबाह्य औषधाचे वाटप..

मुंडगाव आरोग्य वर्धिनी केंद्राचा कारभार रामभरोसे..

देवानंद खिरकर

अकोला / अकोट – मुंडगाव येथिल आरोग्य वर्धिनी केंद्रातुन मुदतबाह्य औषधाचा वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णांच्या सतर्कतेने उघड झाल्याने संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. मुंडगाव येथिल आरोग्य वर्धिनी केंद्रातुन मुदतबाह्य औषधाचे वाटप केंद्रप्रमूख व ईतर कर्मचारी यांच्या कडून उध्दटपणाची वागणूक दिल्याची तक्रार अकोट तालुका ग्रामीण आरोग्य अधिकारी यांचेकडे विकास सरकटे यांनी केली आहे. विकास सरकटे हे त्यांच्या पत्नीसह 6 महिन्याच्या बाळाला घेवून डॉक्टरांनकडे गेले होते डॉक्टरांनी तपासणी करून 6 महिन्याच्या बाळाला औषधी दिली तेच औषधी बाळाला दिल्याने काही वेळातच पुन्हा बाळाला उलट्या व तब्येत खराब वाटल्याने त्यांनी ड्रापवरील औषधीची तारीख तपासली असता मार्च 2020 रोजी मुदत संपल्याचे दिसले.घाबरुन बाळाला व औषधी घेवून आरोग्य वर्धिनी केंद्रात गेले असता केंद्रप्रमुख व ईतर यांना घडलेला प्रकार सांगितला असता ऊलट त्यांनी उध्दटपणाची वागणूक देत तुमच्या कडून जे होते ते करा आमचे कोणी काहिच करु शकत नाही. असि धमकी दिल्याची तक्रार विकास सरकटे यांनी अकोट तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे केली असुन आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आस्वासन दिले. एकीकडे संपुर्ण देशात कोरोना विषाणुचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे मुंडगाव आरोग्य वर्धिनी केद्राचा प्रमुख हा गावातीलच असल्याने तात्काळ रुग्णांना औषध उपचार मीळायला हवा परंतू असे न होता गावातील लोकांना योग्य उपचार व चांगली वागणूक मिळत नाही.

केंद्रप्रमुख हा गावातीलच असल्याने कोणीच त्यांची तक्रार करण्याची हिम्मत करीत नसल्यामुळे मुंडगाव आरोग्य वर्धिनी केंद्राचा कारभार रामभरोसे असल्याची चर्चा संपुर्ण गावात आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!