Home जळगाव सावदा येथे रेशनकार्ड धारक संभ्रमाअवस्थेत , रेशन कोठुन मिळणार याबाबत अनिभिज्ञ

सावदा येथे रेशनकार्ड धारक संभ्रमाअवस्थेत , रेशन कोठुन मिळणार याबाबत अनिभिज्ञ

259

सावदा – (प्रतिनिधि) – सावदा येथे जादा दराने धान्य विक्री, तसेच अनियमितता आसणा-या रेशनदुकांन दाराविरुद्ध महसूल विभागाने कार्यवाही करीत वाघोदा खु, व सावदा शहरातील 2 अश्या ऐकूण तीन दुकानाविरुध्द ही कार्यवाही करीत त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले व त्यांचे परवाने रद्द करण्यात आले या कार्यवाहिने नागरिकात समाधान व्यक्त होत असले तरी सदर रेशनदुकानातुन ज्याना धान्य मिळत होते अश्यान पैकी अजुन बऱ्याच जणाचे या महिन्याचे धान्य घेणे बाकी असताना ही कार्यवाही झाल्याने या लाभार्थीना आता आपले धान्य कोणा कडून मिळेल याबाबत माहिती नसल्याने ते सभ्रमाअवस्थेत आहे,
रेशनदुकांना विरुद्ध कार्यवाही तर झाली मात्र त्यानंतर सदर रद्द करण्यात आलेल्या रेशनदुकांना कड़े ज्या नागरिकांचे धान्य आहे असे लाभार्थी सध्या या महिन्याचे त्यांचे धान्य मिळणे बाकी असणे तसेच लॉकडॉउन दरम्यान सरकार कडून मिळणारे धान्य हे आता कोणाकडून मिळेल याबाबत या नागरिकांना अद्याप माहिती नाही, महसुल विभागाने जरी ही दुकाने दुसऱ्या रेशनदुकानदारा कडे वर्ग करून दिली असली तरी ह्याची माहिती या नागरिकांना नसल्याने ते या सभ्रमाअवस्थेत दिसत आहे त्यामुळे या नागरिकांना महसूल विभागाने त्यांची रेशनदुकाने कोणाकडे वर्ग केली या बाबत माहिती देण्यात यावी जेणे करून यानागरिकांची धान्य मिळविण्यासाठी होणारी वणवण थांबेल.