Home विदर्भ वर्धा जिल्ह्याचा कोरोना कंटेंटमेंट आराखडा तयार

वर्धा जिल्ह्याचा कोरोना कंटेंटमेंट आराखडा तयार

39
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असणार महत्वाची जबाबदारी..

तालुका अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण…

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज….

वर्धा – जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी जिल्हा प्रशासन पॉझिटीव्ह काम करत आहे. मात्र दुर्दैवाने जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास प्रशासनाने काय कार्यवाही करायची यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधीत योजना तयार केली असून याची धुरा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे आणि आरोग्य विभागावर राहणार आहे.

यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतले. तालुका आरोग्य अधिकारी हे तालुका स्तरावर इतर संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतील. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी उपस्थित होते. जिल्ह्यात भविष्यात कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

*कोरोना प्रतिबंधित आराखडा काय आहे.?*

कोरोना रुग्ण आढळल्यास त्याचा प्रादुर्भाव समाजात पसरू नये यासाठी तयार केलेली सुनियोजित योजना म्हणजे कोरोना प्रतिबंधित आराखडा होय. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्र, सीमा निश्चित करणे, कोरोना रुग्ण सहवासितांची यादी तयार करणे, प्रतिबंधित क्षेत्रात निगराणी पथक नेमणे, बफर झोन निश्चित करणे, प्रतिबंधित क्षेत्र नियंत्रण, निर्जंतुकीकरण, रुग्णालय व्यवस्थापन, विलगीकरण सुविधा नियंत्रण आदी महत्वाच्या कामाचा समावेश आहे.

*प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करणे*.

कोरोना रुग्णा ने प्रवेश केलेला परिसर चिन्हांकित करणे, रुग्णांने प्रवास केलेले रस्ते शोधून चिन्हांकित करुन त्याचा नकाशा बनविणे. आणि सदर नकाशाच्या आधारे 3 किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्चित करून क्षेत्र नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेमार्फत कार्यवाही करणे.

*कोरोना रुग्ण सहवासितांची यादी तयार करणे*

एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाची संपूर्ण माहिती काढण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. लक्षणे दिसल्यापासूनच्या 14 दिवस पूर्वीचा प्रवास इतिहास व भेटलेल्या व्यक्तींची अतिशय काटेकोर माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना घ्यायची आहे. तसेच सहवासितांची यादी तयार करताना अति जोखीम असलेले संपर्क व्यक्ती व कमी जोखमीच्या संपर्क व्यक्तींची यादी तयार करून त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक , व काही लक्षणे किंवा त्रास होत असल्यास त्याची माहिती घेण्याचे महत्वाचे काम तालुका वैद्यकीय अधिकारी करणार आहेत.

यादी तयार केल्यावर 24 तासात सहवासितांचा शोध घेण्याचे काम करण्यात येईल. त्यानंतर बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याच्या तारखेपासून पुढील 14 दिवस त्यांना निरीक्षणात ठेऊन लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात येणार आहे.

*प्रतिबंधित क्षेत्रात तत्पर निगराणी पथक*

तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यात 3 सदस्यीय 20 पथक तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकामार्फत प्रतिबंधित आराखड्यानुसार शहरी भागात 100 व ग्रामीण भागात 50 घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. 3 सदस्यीय टीम मध्ये 1 आरोग्य सेवक / सेविका, 1 शिक्षक व एक होमगार्ड यांचा समावेश आहे. पर्यवेक्षणाकरिता आरोग्य सहाय्यक , सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच 10 पथकामागे पर्यवेक्षणाकरिता एक वैद्यकीय अधिकारी
व एक पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत सर्वेक्षण करतील.

सर्वेक्षण करताना सदर पथक घरातील व्यक्तींना सर्दी-खोकला-ताप यापैकी काही
काही लक्षणे असल्याची खात्री करतील. घरातील व्यक्तींपैकी मागील 14 दिवसात कोणी परदेश प्रवास केल्याची तसेच अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती घेतील.

*पेरिमीटर (परिमिती ) नियंत्रण*

निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही बाहेरील व्यक्ती प्रवेश करणार नाही व आतील व्यक्ती बाहेर येणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात येईल.

या क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता होणार नाही तसेच अत्यावश्यक वस्तू बाहेरून आणल्यास त्याचे वाटप करण्यासाठी अंतर्गत व्यवस्था तयार करण्यात येणार आहे

पेरिमीटर नियंत्रणाद्वारे हे सुनिश्चित केले जाईल की, आवश्यक सेवा व वैद्यकीय देखभाल वगळता कन्टेन्टमेंट झोन मधील लोकसंख्येची कोणतीही अनियंत्रित हालचाल होणार नाही

या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जाण्याचा एकच मार्ग ठेवण्यात येणार आहे जेणेकरून सर्व वाहनांची हालचाल आणि कर्मचाऱ्यांची हालचाल नियंत्रित असेल. कन्टेन्टमेंट झोनला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यावरील सर्व रस्ता पोलिसांच्या देखरेखीखाली असेल. सदर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासन साइन बोर्ड लावून परिमिती नियोजनाबद्दल जनजागृती करेल. एक्झिट पॉईंटवर नेमणूक केलेले आरोग्य कर्मचारी स्क्रीनिंग करतील. प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांचे सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात येईल. सदर प्रतिबंधित क्षेत्रात जाण्या-येण्यासाठी एकच एन्ट्री व एक्झिट पॉइंट तयार करण्यात येणार आहे पोलीस विभागामार्फत संपूर्ण क्षेत्राचे बॅरिकेटींग करण्यात येणार आहे.

या संपूर्ण व्यवस्थेवर पोलिस अधिक्षक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, , नगरपरिषद मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांचे लक्ष असणार आहे.

*निर्जंतुकीकरण*

प्रतिबंधित क्षेत्र मध्ये तसेच इतर सर्व सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांचे सोडियम हायपो क्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करतील.

Unlimited Reseller Hosting