Home मराठवाडा अन, त्या धान्य दुकानदाराने दुकान उघडलेच नाही ??? धान्य खरेदी साठी लोकांची...

अन, त्या धान्य दुकानदाराने दुकान उघडलेच नाही ??? धान्य खरेदी साठी लोकांची रीघ ,

22
0

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया ने प्रकाशित केली होती बातमी ,

बदनापूर/सय्यद नजाकत

शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करून शासन दरापेक्षा जास्त पैसे घेत आहे मात्र तालुका पुरवठा विभाग डोळे असून आंधळ्याची भूमिका बजावत असल्याने काही जागृत नागरिकांनी 9 एप्रिल रोजी थेट शहरातील एका स्वस्त धान्य दुकानदारस पावती ची मागणी केल्यानंतर 10 एप्रिल रोजी त्या दुकानदाराने दुकान उघडलीच नाही त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत ताटकळत रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना हात हलवीत घरी परतावे लागले तर एका ही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही हे विशेष!

कोरोना रोगामुळे सर्व आस्थपणा बंद करण्यात आलेले असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना देखील हाताला काम राहिलेले नाही तर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी कोरोना चा पुरेपूर फायदा उचलत अन्न धान्याचे भाव दीड पट करून विक्री सुरू केलेली आहे तर दुसरीकडे शासनाने गोर गरिबांना अल्पदरात अन्न धान्य सुविधा स्वस्त धान्य दुकानामार्फत केलेली असतांना बदनापूर शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार अव्वाच्या सव्वा भावात अन्न धान्य देत असल्याने गोर गरीब वैतागले आहेत

बदनापूर शहरातील स्वस्त धान्य दुकानदार शासन दराने अन्न धान्य देत नसल्याने अनेकांनी तालुका पुरवठा अधिकाऱयांना भ्रमणध्वनी केला मात्र तालुका पुरवठा अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने काही जागरूक नागरिकांनी 9 एप्रिल रोजी शहरातील शंकरनगर भागातील चार नंबर स्वस्त धान्य दुकानात स्वस्त धान्य उपलब्ध होताच तोबा गर्दी केली मात्र दुकानदार जास्त दर मागीत असल्याने चिडलेल्या नागरिकांनी हाताचा अंगठा दिल्यानंतर मालाची व रकमेची निघणारी पावतीची मागणी केल्याने दुकानदार हताश झाला आणि नाईलाजास्तव 50 ते 60 लोकांना धान्य वाटप केल्यानंतर दुकान बंद करून उद्या वाटू असे म्हणत निघून गेला

*पावतीचा परिणाम*

स्वस्त धान्य दुकानातून अल्पदरात दिले जाणारे धान्य शासकीय दराने वाटप करण्याची वेळ आल्याने दुकानदाराने नवीन शक्कल लढवली असून 10 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत रांग लावून उभे राहिलेल्या नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने दुकानदाराने दुकान उघडलीच नाही दरम्यान गोर गरिबांची तालुका पुरवठा अधिकाऱयांना भ्रमणध्वनी केला असता तालुका पुरवठा अधिकाऱयांनी प्रतिसाद दिला नाही व शेवटी बारा वाजता महिला व इतरांना हात हलवीत घरी परतावे लागले

*****

बाबासाहेब चोरमारे- शंकरनगर बदनापूर

बदनापूर शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार शासन दराने अन्न धान्य न देता जास्त दराने विक्री करीत आहे परंतु पुरवठा अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे 9 एप्रिल रोजी शंकरनगर भागातील स्वस्त धान्य दुकानदारास मालाची पावती मागितल्याने 10 एप्रिल रोजी त्यांनी दुकान उघडलेच नाही व लोकांना तब्बल सहा तास वाट बघून घरी परतावे लागले