Home मराठवाडा परदेशातून, परराज्यातून, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची माहिती दयावे – जिल्हाधिकारी...

परदेशातून, परराज्यातून, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची माहिती दयावे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

30
0

नांदेड, दि. ०९ :- ( राजेश भांगे ) – जी व्यक्ती परदेशातून, परराज्य व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे परंतू स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही तसेच प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी त्यांची माहिती संबंधीत तहलिसदार यांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे कळवावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना (कोव्हिड १९) या विषाणमुळे पसरत चालेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. ३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार १४ मार्च २०२० रोजी अधिसुचना निर्गमीत केली आहे.

त्यानुसार जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्याच्या बाहेरुन जिल्ह्यात प्रवास करुन आलेल्या नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे.

तथापि अशी व्यक्ती, जी परदेशातून, परराज्यातून व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे परंतू सदर व्यक्तीने स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही / प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी संबंधीत तहलिसदार यांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांची माहिती कळवावी. जेणेकरुन संबंधीत व्यक्तींची तपासणी करुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुलभ होईल.

तसेच सर्व संबंधीत तहलिसदार यांनी स्वत: या कामी लक्ष देऊन त्यांच्या स्तरावरुन अशी माहिती संकलित करावी. त्यांच्याकडील व जनतेतून प्राप्त होणारी माहिती दररोज उपजिल्हाधिकारी (लसिका) श्रीमती संतोषी देवकुळे (भ्रमणध्वनी क्र. ९४२२९६१०९०) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे दयावी, असे आदेश नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

Unlimited Reseller Hosting