Home जळगाव सातपुडयातुन आलेल्या अठरा कुटूंबांना खिर्डी येथील तत्पर फाऊंडेशन ने दिला मदतीचा हात

सातपुडयातुन आलेल्या अठरा कुटूंबांना खिर्डी येथील तत्पर फाऊंडेशन ने दिला मदतीचा हात

215

अन्न धान्यासह बिस्कीट वाटप…!

रावेर (शरीफ शेख)

सध्या देशासह राज्यात 21 दिवसांचा लाँकडाऊन असून यात मात्र गोरगरीब जनता स्वतःच्या पोटासाठी सैरावैरा धावताना दिसत आहे यात खिर्डी येथील पत्रकार यांनी स्थापन केलेली सामाजिक संथा तत्पर फाउंडेशने रोजगाराच्या शोधार्थ व गहु हरभरा मका कापणी साठी आलेल्या बरीब मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगार झालेले व त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली असल्याने त्यांचे चुले परत पेटावे व उपासमार होऊ नये म्हणून त्यांचे लहान मुलांना बिस्किटे वाटप तसेच त्यांचे परिवार यांचे पोटाची खडगी भरावी म्हणून एकूण सातपुडयातुन या परिसरात आलेल्या एकूण 18 परिवार यांना जिवनावश्य वस्तु म्हणुन किराणा व तांदूळ वाटप करण्यात आली संध्या लॉकडाऊनमुळे शेती कामांनाही ब्रेक बसला आहे काम मिळत नाही त्यामुळे या कुंटूबार उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे कुंटूबे वाहने नसल्या मुळे आपल्या घरी सुद्धा जावू शकत नाही त्यामुळे या कुंटूबांना मदती साठी तत्पर फाऊंडेशन या लोकांचा शोध घेवून त्यांना जिवनावश्यक वस्तु पुरविण्याच कार्य हाती घेतले आहे

तसेच या संस्थेने या आधी बरेच सामाजिक उपक्रम घेऊन बांधिलकी म्हणून परिसरात विविध समाज कार्य केले आहे कोरोना व्हायरस आजाराला आळा घालण्यासाठी संस्थेच्या वतीने गाव व गाव परिसरात मास्क वाटप केले तसेच परिसरातील गावात जावून सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक डॉक्टर आशा वर्कर आंगणवाडी सेविका यांना सोबत घेवून कोरोना पासुन बचावण्या साठी जनजागृती करत आहे या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष- गुणवंत पाटील,उपाध्यक्ष-चंद्रकांत कोळी, सचिव-प्रविण धुंदले, सदस्य प्रदीप पंजाबी महाराज, संकेत पाटील, रितेश चौधरी, कांतीलाल गाढे ,शेख इंद्रिसभाई सतीश फेगडे अंकित पाटील ,सादिक पिंजारी, गावाचे पोलीस पाटील ,प्रदीप पाटील व ग्रामस्थ आदींसह मोठय़ा संख्येने उपस्थित होते.