Home मराठवाडा मुखेड येथील कोरोना हाॅस्पिटलला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट – खाजगी दवाखाने...

मुखेड येथील कोरोना हाॅस्पिटलला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट – खाजगी दवाखाने सुरु न केल्यास कारवाई होणार

53
0

नांदेड,दि.४ ( राजेश भांगे ) – नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी मुखेड व नांदेड रुग्णालय येथे ५० बेड चे विशेष कोरोना रुग्णालय सुरु केले असुन यात मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यासह देगलुर, नायगाव , कंधार,बिलोली येथील कोरोना रुग्णास आणण्यात येणार आहे. येथील सुविधा सोई – सुविधा पाहण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली.

या भेटीत आ.डॉ. तुषार राठोड यांच्यासह
उपविभागीय अधिकारी शक्ती कदम,तहसिलदार काशिनाथ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,कोरोना विभागाचे नोडल ऑफिसर डॉ नागेश लखमावर ,वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, तलाठी बि.आर. बोरसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून कोरोनाच्या रुग्णासाठी लागेल ते साहित्य खरेदी करावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले व येथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. तर आ.डॉ.तुषार राठोड यांनी रुग्णालयाच्या साहित्य खरेदी साठी २५ लक्ष रुपये निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील खाजगी दवाखाने डॉक्टरांनी चालु करावीत अन्यथा त्यांच्या योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी निर्देश दिले आहेत. खाजगी दवाखाने बंद असल्याने अनेक रुग्णाचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात कसल्याच सुविधा नसल्याने नागरीक शहरात येत आहेत पण शहरातील दवाखाने बंद असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दवाखाने चालु करण्यात यावे असे निर्देश दिल्याने खाजगी डॉक्टर आपली दवाखाने चालू करतील की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते गोर गरीब, हातावरचे पोट असणाऱ्यास धान्यही वाटप करण्यात आले. मुखेड तालुक्यात तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवले असल्याने शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे .

*सुचना*
– लाॅकडाऊनचे सर्व नागरिकांना योग्य पालन करावे,अनाश्यकपणे फिरणाऱ्या पोलीसांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असून नागरिकांनी घरीचं थांबवून प्रशासनास सहकार्य करावे. – शक्ती कदम उपविभागीय अधिकारी,देगलूर.

– सर्व नागरिकांनी स्वताची व कुंटुंबाची काळजी घेणे आवश्यक असून नागरिकांची जिवनावश्यक वस्तु सगळ्या ठिकठिकाणी उपलब्ध करुन दिले आहे.त्यामुळे कुठंही गर्दी करु नये. – काशिनाथ पाटील
तहसीलदार,मुखेड.

Unlimited Reseller Hosting