Home मराठवाडा लॉकडाऊन दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणारे सावधान ; कुंटुर, ए.पी.आय.के.एस पठाण

लॉकडाऊन दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणारे सावधान ; कुंटुर, ए.पी.आय.के.एस पठाण

80
0

नांदेड , दि.४ ; ( राजेश भांगे ) – नायगांव (बा) ता.कुंटुर पोलीस स्टेशन येथे ज्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होत आहेत त्यांना भविष्यकाळात चारित्र्य पडताळणी मध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही.
त्याचबरोबर भविष्यकाळात पासपोर्ट, शस्त्र परवाना , व्यवसाय परवाने मिळताना मोठी अड़चन निर्माण होणार आहे.
आपल्या थोड्याश्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल असुन.
त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉक डाऊन चे पालन करणे आवश्यक आहे. तरी अल्लड व अतिउत्साहाच्या भरात वावरणाय्रा तरूणांचे भविष्य काळातील जीवन, चारित्र्य कलंकित होवु नये. तरी तरूणांनी तसेच नागरिकांनी लाॕकडावुन चे नियम पाळत विनाकारण रस्त्यावर न फिरता प्रशासनास सहकार्य करावे असे सद्दभावनापुर्ण भावनिक अवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. एस. पठाण पोलीस स्टेशन कुंटूर यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting