Home जळगाव जळगाव कासोदा येथील हिंदू मालकांने केली मुस्लिम कामगारासाठी नमाज पडण्याची सोय

जळगाव कासोदा येथील हिंदू मालकांने केली मुस्लिम कामगारासाठी नमाज पडण्याची सोय

65
0

प्रतिनिधी लियाकत शाह

जळगाव: कासोदा गावाच्या व्यापाऱ्यांना लॉक डाऊन मुळे मोठी अडचण मुळे हिंदू मालकां ने केली मुस्लिम कामगारासाठी नमाज पडण्याची सोय केली. जळगाव कासोदा तालुका एरंडोल येथील ४० टक्के लोक चादर, सतरंजी व ब्लँकेटच्या व्यापार करण्यासाठी बाहेरगावी जातात. सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे त्यांना मोठी अडचण येत आहे काही तेथेच अटकले गेले आहेत त्यांना गावा कडे येता जात नाही. त्यांना तेथे घरात बसल्याने व्यापाराला जाता येत नाही त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे परंतु अशा काळात काही लोक हिंदू-मुस्लीम न पाहता त्यांना सहकार्य करीत आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे कासोदा येथील मुस्लिम युवक आदिल अलफोद्दींन मुल्लाजी कामानिमित्त नारायणगाव येथे होते. त्यांना गावाकडे येता येत नाही म्हणून त्याचे मालक रिटायर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत इचके आहे. त्यांनी त्याला राहण्याची जेवण्याची की व नमाज पडण्यासाठी सोय करून दिली त्यामुळे आदील यांनी व्हाट्सअप वर व्हिडीओ कॉलिंग पाठवून हा मेसेज दिला या मुळे प्रशांत इचकेचा सर्वत्र कौतुक होत आहेत.