Home मुंबई मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रातील परिसरात सोशल डिस्टनसिंग व स्थानिक पोलिसांना सहकार्य करा...

मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रातील परिसरात सोशल डिस्टनसिंग व स्थानिक पोलिसांना सहकार्य करा असे नागरिकांना आवाहन.

187

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पंतप्रधान सन्मानीय नरेंद्र मोदीजी सोशल डिस्टनसिंग बद्दल माहिती व स्वतः कृती करून अंमलात आणली आहे. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटकजी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अशोक रायजीने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे उपाययोजना अंमलात आणावी असे निर्देश सुद्धा दिलेले असून त्याची सुरुवातही अनेक भागांत दिसत आहे. मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी आपल्या परिसरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावावर अथवा भाजी विक्रते जवळ गर्दी करू नये! अशी उपाययोजना अंमलात आणावी असे कळकळीचे विनम्र आवाहन सामाजिक कार्यकर्ते हेमंत भास्कर,जयवंत दामगुडे,धर्मवीर सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान प्रभागातील सर्व वसाहतीमध्ये जंतुनाशक औषधांची फवारणी पालिका एम/पूर्व विभागाने तत्काळ केली पाहिजे!अशी मागणी पालिका सहाय्यक आयुक्त,एम पूर्व विभाग,देवनार ,मुंबई.यांच्याकडे करण्यात येणार आहे.
सोशल डिस्टनसिंगसाठी आता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर सर्कल आखण्यात यावेत . याठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांमध्ये एक मीटरचे अंतर आखून देण्यात आले पाहिजे!तसेच दुकानासमोर स्वयंसेवक तैनात करून क्रमवारीने नागरिकांना सोडण्यात आले तर अप्रतिम आहे.

त्याचप्रमाणे येथील नागरिकांनी देखील सदर उपयुक्त उपाययोजनेचे स्वागत करावे आणि शिस्तीने रांगा लावत खरेदी सुरू केली पाहिजे!मानखुर्द,देवनार आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे स्थानिक पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशी आर्जव विनंती सोशल मीडियातुन हेमंत भास्कर,जयवंत दामगुडे,धर्मवीर सिंह यांनी केली आहे.
दरम्यान विभागात सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासन यांनी घेतली आहे.त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता वस्तू घ्याव्यात असे आवाहनही केले आहे.