Home महत्वाची बातमी राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण , पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर...

राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण , पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्या कडे मांगणी ,

260

औरंगाबाद ,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिर्बंध अधिकार मिळाल्याने पोलीस सर्वसामान्यांना जनावरा प्रमाणे मारहाण करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र औरंगाबादमध्ये पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख मनोज जाधव यांना ही मारहाण करण्यात आली आहे. देवगडहून औरंगाबादला जात असताना मनोज जाधव यांची गाडी अडवण्यात आली. आपण पत्रकार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसेच सोबतचं आयकार्ड देखील दाखवलं मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना मारहाण केली. माझं नाव आणि नंबर पाहा आणि तुला काय करायचं ते कर, अशी अरेरावीची भाषा यावेळी मारहाण करणाऱ्या हवालदारानं केली. याप्रकरणी तिथंच बसलेल्या फौजदाराला विचारणा केली असताना त्यानेही हवालदाराला आवरण्याचे कष्ट घेतले नाहीत. मारहाण करणारे पोलीस गंगापूर पोलीस ठाण्याचे आहेत. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे पी आय सुरवसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसे आदेश आहेत, मात्र औरंगाबाद पोलिसांकडून मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांच्या आदेशाला हरताळ फासण्याचं काम करण्याच आलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीसवाला वेब पोर्टलचे मुख्य संपादक विनोद पात्रे तसेच पोलीसवालाचे संपादक व लोकमत समाचारचे जेष्ट पत्रकार अमीन शाह आणी अखिल भारत जर्नालीस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितिचे सदस्य लियाकत शाह यांनी सांगितले के पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंब आहेत आणी महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संपूर्ण राज्यचे पत्रकार हे अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची परवानगी आहेत. आम्ही सर्व पत्रकार संघटना राज्यात पत्रकारांना केली मारहाणचा निषेद करतो.