Home महत्वाची बातमी बहुचर्चित तुषार पुंडकर हत्या प्रकरणात तिन आरोपी गजाआड….. भावाच्या हत्ये चा बदल...

बहुचर्चित तुषार पुंडकर हत्या प्रकरणात तिन आरोपी गजाआड….. भावाच्या हत्ये चा बदल घेण्यासाठी गोळीबार : आरोपिची कबुली…

93
0

देवानंद खिरकर :

अकोट ,

= प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.तुषार पुंडकर यांची हत्या राजकिय हेतूने प्रेरीत नव्हे तर जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.पुंडकर हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर पवन सेदाणी, शाम नाठे,अल्पेश दुधे या तिन आरोपींना गुरुवारी अटक केली आहे. शहर पोलिस स्टेशन अकोटच्या पोलिस वसाहतीमधे तुषार पुंडकर यांच्यावर आरोपींनि देशीकट्यातुन गोळ्या झाडून त्याची 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास निर्घुण हत्या केली होती.मारेकर्यांनि नियोजनपूर्वक हत्या करण्याचा कट रचला होता.हे घटनेतून दिसून येते.गोळीबार केल्यावर तुषार पुंडकर कोणत्याही परिस्थितीत जीवंत राहता कामा नये.याच हेतूने मारेकर्यांनि त्यांच्यावर पाठीमागुन डोक्यात ,छातीत आणि त्यांच्या पाश्वभागावर गोळीबार केला होता.या हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली होती.मारेकरांच्या शोधासाठी पोलिसांचे सहा पथके कामाला लागले होते.सर्वच प्रकारे तपास करुन आरोपी पोलिसांचे हाती लागत नव्हते. या हत्याकांडाच्या तपासाची संपुर्ण जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शैलेश सपकाळ व त्यांच्या चमुने घेत,महिन्याभराच्या अथक परिश्रमानंतर या प्रकरणात अकोट येथिल आरोपी पवन सेदाणी,शाम नाठे,अल्पेश दुधे यांना अटक करुन तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे.पुंडकर यांच्या हत्ये नंतर अनेक चर्चांना उत आला होता.राजकिय,खंडणी,प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा कयास लावल्या जात होता.त्यामूळे पोलिसांनी सर्वच दृष्टिकोनातून तपास करीत,अकोट मधिल अनेक संशयिताची उलट तपासणी केली.परंतू या तपासणीतून काहिच निष्पन्न झाले नाही.अखेर पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शैलेश सपकाळ यांनी सूत्रे हाती घेत,गतीने तपासाची चक्रे फिरवीली आणि आरोपींना गजाआड करण्यात मोलाची भुमिका बजावली.
सूड घेण्यासाठी पुंडकर यांची हत्या!
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा सहकार्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या वादातून 11 सप्टेंबर 2013 रोजी सरस्वती नगरातील पवन सेदाणी याचा चुलत भाऊ तेजस सेदाणी याची धारदार शस्त्र व लोखंडी पाईपने मारहाण करुन निर्घूण हत्या केली होती.हत्येचा सूड घेण्यासाठी आरोपी पवन सेदाणी याने तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचला आणि शाम नाठे,अल्पेश दुधे या सहकार्याच्या मदतीने तुषार पुंडकर यांच्यावर देशी कट्यातून गोळीबार करुन त्यांची निर्घुन हत्या कल्याचे तपासात समोर आले आहे.

गणेशोत्सव मंडळामुळे उद्भवला होता वाद
मृतक तेजस सेदाणी याने काही युवकासह शिवाजी कालेज रोडवर नविन गणेश मंडळाची स्थापना केली होती.परिसरात एकच गणेशोत्सव मंडळ असावे.अशी तुषार पुंडकर यांची अपेक्षा होती.या गणेशोत्सव मंडळाला तुषार पुंडकर यांचा विरोध होता.त्यामूळे त्यांनी व सहकार्यांनि तेजसची हत्या केल्याचा आरोप तेजसचे वडील सुरेश सेदाणी यांनी त्यावेळी तक्रारीत केला होता.

Unlimited Reseller Hosting