Home विदर्भ लाखो ट्रक्स व वाहने संपूर्ण चक्काजाम ने रस्त्यावर अडकली – ऍड. विनोद...

लाखो ट्रक्स व वाहने संपूर्ण चक्काजाम ने रस्त्यावर अडकली – ऍड. विनोद तिवारी

95
0

वाहतूकदार व ड्रायव्हर्स ची सोय कोण लावणार ? त्यांच्या मालाची व वाहनांची सुरक्षा व्यवस्था कुणाची जबाबदारी ?

राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणाचे आदेश आवश्यक !

कोरोना व्हायरस च्या वैश्विक महामारी चे भयंकर संक्रमण रोखण्यासाठी भारत सरकार ने लॉक डाऊन ची आवश्यक कडक कारवाई केली, त्याचे स्वागतच पण आज दिवस भर एक महत्त्वाचा गंभीर विषय माझे एक मित्र सरदार मनजितसिंग अब्रोल, चेंबूर मुंबई यांनी माझे समोर आनला. त्यावर तातडीने काम सुरु करून केंद्र सरकारच्या दरबारी विषय जिकरिने रेटने सुरू केले आहे.

तो म्हणजे काल मध्यरात्रीपासून ट्रक ट्रांसपोर्ट ची वाहतूक या लॉक डाऊन मुळे जिथे होती तिथे च थांबलेली आहे, याचा अर्थ असा की भारताच्या विभिन्न नॅशनल हायवे, स्टेट हायवे, जिल्हा मार्ग, या वरची सुमारे दहा लाख पेक्षा जास्त वाहने जी त्यावेळी रस्त्यावर होती, ती सगळीच्या सगळी या लॉक डाऊन च्या अक्षरशः चक्काजाम मुळे, जिथे होती त्याच ठिकाणी अडकून पडली आहेत. देशव्यापी संचारबंदी लागू झाल्याने ही अभूतपूर्व स्थिती पहिल्यांदाच देशात निर्माण झाली आहे. ती सुद्घा सद्या २१ दिवस , कधी संपेल कुणी आज सांगू शकत नाही !! अभूतपूर्व व अकल्पनीय !!

याचा परिणाम म्हणजे एक अभूतपूर्व परिस्थिती समोर आली आहे, ज्यात लाखो ट्रक वाल्यांचे खूप हाल होत आहे. कुणी वाली नाही, कारण मार्गावरील सर्व हॉटेल्स, धाबे, खानावळी व लहान सहान दुकाने सुध्धा बंद आहेत. त्यांच्या मालाची, संपत्ती ची व त्यांच्या गाडीची सुरक्षा कोण करणार ? याचे कोणतेही दिशानिर्देश – गाईड लाईन मध्ये केंद्र सरकारने दिलेले नाहीत .

राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणाने या सर्व बाबींची दक्षता घेणे आवश्यक होते. असे लाखो ट्रक संपूर्ण देशभरात, प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात देश भर अडकले आहेत. कित्येक ड्रायव्हर व क्लिनर ना भाषेचा प्रश्न आहे. पैसे नाहीत. मोबाईल चार्जिंग ची व्यवस्था नाही. हायवे वरती सर्व हॉटेल्स बंद आहेत. खाण्यापिण्याची सोय नाही. पेट्रोल पंप सुध्धा लिमिटेड वेळेतच सुरू आहेत.
कोरॉना संक्रमण होईल म्हणून, गाव वाले गावात येऊ देत नाही. त्यांचं काय होणार ?

हा प्रश्न देशव्यापी आहे , कुण्या एका राज्य सरकार चा नाही. म्हणूनच माझी केंद्र सरकार ला अशी विनंती आहे की राष्ट्रीय आपदा प्रबंधन कमिटीने ताबडतोब गाईडलाईन जाहिर करून या सर्व वाहतूकदारांची व्यवस्था करण्याचे आदेश देशातील सर्व राज्य सरकारे व प्रत्येक जिल्हा प्रशासनाला व उपविभागीय प्रशासनाला द्यावेत. त्यांनी हे सर्व ट्रक ट्रांसपोर्ट व्हीकल, जिथे आहेत, त्याच प्रत्येक गावाजवळ व्यवस्था करावी. असे पन्नास – शंभर ट्रक चे जत्थे एकाच ठिकाणी दूरदूर थांबवले, तर त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरची खाण्यापिण्याची व आरोग्य तपासणी ची व्यवस्था करण्यात यावी व त्यांच्या संपत्तीचे जतन सुद्धा होईल.

यावर तोडगा काढण्यासाठी आज मी राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणा कडे व महाराष्ट्र सरकार च्या राज्य आपदा प्रबंधन प्राधिकरणा कडे निवेदन दिले आहे.

आशा आहे की या वर तातडीने कारवाई केली जाईल.