Home जळगाव बौद्ध कुटुंबावर झालेल्या भ्याडहल्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषिन्वर कठोर कारवाई करण्यात यावी...

बौद्ध कुटुंबावर झालेल्या भ्याडहल्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषिन्वर कठोर कारवाई करण्यात यावी ,

103
0

बौद्ध समाजाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

रावेर (शरीफ शेख) लाख खंडाळा ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे बौद्ध कुटुंबावर झालेल्या भ्याडहल्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषिन्वर कठोर कारवाई होणे बाबत. रावेर तालुका समस्त बौद्ध समाजाच्या वतीने निवेदन तहसिलदार दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की, लाख खंडाळा ता. वैजापुर जि. औरंगाबाद येथील बौद्ध समाज्याच्या गायकवाड कुटुंबियान्वर आंतजातीय प्रेम विवाहाच्या प्रकरणातुन भ्याड हल्ला करुन भिमराज गायकवाड या १७ वर्षिय तरुनाची मान तलवारीने कापुन हत्या करण्यात आली. ही गोष्ट पुरोगामी म्हणविना-या महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत लाजीर्वाणी आहे तसेच जातियवादी गुंड तेवढ्यावरच न थांबता गायकवाड कुटुंबियांना हत्यारानिशी बेदम मारहान करुन गंभिर रित्या जखमी करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्राची संवेदनशीलता इतकी बोथट झाली आहे काय? असा प्रश्न पडावा.औरंगाबाद जिल्ह्यातील
ही तिसरी घटना आहे. डोंगरगाव, ता. सिल्लोड येथे वंदना साळवे आणि त्यांची लेक भारती साळवे यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
अंधारी, ता. सिल्लोड येथे महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. पाच दिवसांपूर्वी आपल्या मुलीशी लग्न केल्याच्या
संशयावरून कथित प्रियकराच्या घरावर रात्रीच्या पोटात हल्ला करण्यात आला. आई, वडिल गंभीर जखमी झाले. धाकटा भाऊ भीमराज गायकवाड (वय १७ वर्ष) झोपला होता. त्याच्या मानेवर तलवार चालवण्यात आली. शिरधडावेगळं करण्यात आलं.
या प्रकरणात आधी तक्रार झाली होती. जीवाला धोका असल्याचं पोलीसांना कळवण्यात आलं होतं. पण
अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. भीमराजला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून
द्यायचा असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
पीडितांचं तातडीने पुनर्वसन व संरक्षण करण्यात आलं पाहिजे. आंतरजातीय प्रेमातून विवाह करणाऱ्या दाम्पत्याला संरक्षण व मदत शासनाने दिली पाहिजे, यासाठी सरकारने योजना जाहीर करावी, तसेच या भ्याड हल्ला करणा-या सर्व आरोपिंना त्वरीत अटक करुन सदर खटला फास्टट्रक कोर्टात चालविण्यात येवुन आरोपिंना
फाशिची शिक्षा सुणावण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसिलदार ऊषाराणी देवगुणे यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदनाचा प्रती मा. राज्यपाल सो, मा. मुख्यमंत्री सो, मा, गृहमंत्री सो, मा. जिल्हा अधिकारी सो, मा. पोलिस अधिक्षक सो, यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे.

निवेदनावर माजी. नगरसेवक महेंद्रजी गजरे, बाळू शिरतुरे, महेश तायडे,अॅड. योगेश गजरे, राजेंद्र अटकाळे, संघरत्न दामोदरे, विवेक तायडे,संघरक्षक तायडे, सावन मेढे,पंकज वाघ, राहुल डि. गाढे, बाळु रजाने, सावन मेढे, सदाशिव निकम, धनराज घेटे, सुधिर सैंगमिरे, इच्छाराम मोराणे, सलिम शाह, शकिल शेख आसम, सुधिर घेटे, सुनिल मेढे, संजय निकम, आदिंच्या सह्या आहे.

Previous articleरविवारी २२ मार्चला देशात सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत लागणार ‘जनता कर्फ्यू’
Next articleअमरावतीत २ कॉरोनटाईन रुग्णालये सज्ज…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here