Home मुंबई खासगी ट्यूशनवाल्यांनो, क्लास बंद ठेवा अन्यथा कारवाईला सामोरं जा!

खासगी ट्यूशनवाल्यांनो, क्लास बंद ठेवा अन्यथा कारवाईला सामोरं जा!

179
0

राजेश भांगे

मुंबई , दि. १६ :- ज्या शहरांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी आहे त्या शहरातील खासगी ट्यूशन क्लासही बंद ठेवण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जे क्लासवाले हे आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा देखील त्यांनी दिला आहे.
अनेक जण एका ठिकाणी आल्यावर कोरोनाचा प्रसार होऊ शकतो या उद्देशाने राज्यातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र शाळांशिवाय अनेक क्लासही आहे जिथं मुलं रोज जात असतात.