मराठवाडा

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात ओबीसी काॕलम नसेल तरा कार्यक्रम उधळून लावणार – ओबीसी नेत्यांनी दिला इशारा

Advertisements

नांदेड , दि. १४ – ( राजेश भांगे ) –
मध्य भारतीय शांशीत संघटनेच्या वतिने आयोजित ओबीसी जनगणना परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात ओबीसी समाजातील नेत्यांनी इशारा दिला.

दि. १२ मार्च गुरवार रोजी नांदेड येथे कुसुम सभाग्रहात ओबीसी जनगणना परिसंवाद मेळावा घेण्यात आले. या मेळाव्यात ओबीसी चे राष्ट्रीय प्रचारक प्राध्यापक श्री. श्रावण देवरे , दिल्ली विद्यापिठ येथील प्राध्यापक श्री.संदिप यादव यांनी यावेळी ओबीसी जात निहाय जनगणना का महत्वाची आहे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय पिछडा शांशीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एस.जी, माचनवाड श्री गोविंद सुरनर, एॕड.श्री प्रदिप राठोड यांच्यासह ओबीसी जात समुहातील नेते उपस्थित होते.
२०२१ साली राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम आखण्यात आला असुन. या कार्यक्रमा दरम्यान सर्व जात समुहाची नोंदणी केली जाते. पण मागील ७० वर्षा पासुन ओबीसी जात निहाय जनगणना केली जात नाहि. त्यामुळे ओबीसी समाजाला या देशात इतर जाती समुहां प्रमाणे मिळणाऱ्या योजना मिळत नाहित. या देशात ५८ टक्के ओबीसी समाज राहतो पण हा समाज आजहि सर्वच क्षेत्रात मागास आहे. त्यामुळेच येणाऱ्या राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात ओबीसी जातनिहाय जनगणना होणे अत्यंत गरजेचे आहे. व जनगणनेच्या फाॕर्म मध्ये ओबीसी कॉलम असावा अन्यथा हा जनगणना कार्यक्रम उधळून लावणार असल्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळी बोलताना दिला.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...