Home जळगाव रावेर येथे फुले , शाहू , आंबेडकर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या...

रावेर येथे फुले , शाहू , आंबेडकर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

44
0

रावेर – शरीफ शेख

रावेर येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात “भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रेणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणा-या” क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले.

यावेळी नगरसेवक जगदीश घेटे , माजी. नगरसेवक ॲङ.योगेश गजरे,मुख्याध्यापक रविंद्र तायडे, उप. अधिक्षक भूमी अभिलेख आर.एस. घेटे साहेब, फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,ॲङ सुभाष धुंदले,माजी जिल्हाध्यक्ष युवक कॉग्रेसचे पंकजभाऊ वाघ, खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटूभाऊ महाजन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे,सचिव धुमाभाऊ तायडे,सेतू सुविधा मॅनेजर धनराज घेटे, सुविधा ऑनलाईनचे राहूल डी. गाढे,संतोष चौधरी,संतोष गाढेसर,सुधीर सैंमिरे,राहुल राणे नितीन तायडे, मनोहर ससाणे,संकेत तायडे,रमजान तडवी, गोपाळ अटकाळे यांचेसह तालुक्यातील असंख्ये वाचक मोठयासंख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यानी तर आभार अमर पारधे यानी मानले.

Unlimited Reseller Hosting