Home मराठवाडा माहूर पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त रॅली.

माहूर पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त रॅली.

37
0

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ०९ : – जागतिक महिला दिना निमित्त माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री एल.व्ही.राख यांच्या नेतृत्वाखाली महिला व शाळकरी मुलींच्या प्रमुख उपस्थितीत श्री दत्त चौक (T पॉईंट) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रॅली काढण्यात आली .

विद्यार्थीनीना व महिलांना जागतिक महिला दिना निमित्त मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करताना माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री एल.व्ही राख साहेब, महिला सशक्तीकरणं व सबलीकरण चा अर्थ शाळकरी मुलांना आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनातुन मार्गदर्शन करताना जेष्ट सामाजिक सेविका सौ.कृत्तिकाताई सिद्धेश्वरजी वरणगावकर, नगराध्यक्षा कु.शितलताई मेघराजजी जाधव,उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, श्री धोंडीबा चव्हाण सर व महिला दिना निमित्त विध्यार्थीनी विशेष सहभाग नोंदवुन मार्गदर्शन करतांना कु. श्रुष्टी शेषराव पाटील व कु.संध्या संजय देवतळे, व प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी माहूर चे श्री जाधव , माहूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री शरद घोडके, माहूर न.प.च्या बांधकाम सभापती सौ.वनिताताई भगवानराव जोगदंड पाटील, नगरसेविका शकीलाबाजी शेख शब्बीर, नगरसेविका मिना रुपेश कोवे, पोलीस अधिकारी श्री शेळके , श्री नागरगोजे साहेब, श्रीमती विजया विनोद मुळे, श्रीमती संजीवनी शाम राठोड, जयश्री चव्हाण, मिनाक्षी राठोड, मिनाक्षी पाटील, वंदना भिसे, अनिता नागपुरे, स्नेहल कापसे,स्मिता तिवारी, अंकिता चंदेल, माहूर शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, माहूर न.प.चे कर्मचारी विजय पाटील शिंदे, गणेशभाऊ जाधव, सुरेंद्रजी पांडे उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting