Home महत्वाची बातमी अन त्या पोलीस उपनिरक्षकाने पोलीस ठाण्यातच केली आत्महत्या….!!

अन त्या पोलीस उपनिरक्षकाने पोलीस ठाण्यातच केली आत्महत्या….!!

84
0

अमीन शाह – विनोद पञे

यवतमाळ , दि. ०७ :- यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे साहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके यांनी गळफास लावून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. काल रात्री उशिरा त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
राजू उईके हे गुन्हे शाखेत कार्यरत होते. शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत ते कामावर होते. सकाळी काही पोलीस शिपाई त्यांच्या कक्षात गेले तेव्हा त्यांना उईके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही माहिती मिळताच यवतमाळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सोयरे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले. राजू उईके यांनी आत्महत्या का केली याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत.

कामाचा ताणाबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून ते गेल्या काही दिवसांपासून काळजीत होते, अशी चर्चा यवतमाळमधील पोलीस वर्तुळात आहे.