Home मराठवाडा कर्करोग तपासणी शिबिराचे शनिवारी नांदेड येथे आयोजन

कर्करोग तपासणी शिबिराचे शनिवारी नांदेड येथे आयोजन

98

नांदेड दि. ६ ; ( राजेश भांगे ) :- कर्करोग रुग्णांसाठी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे शनिवार ७ मार्च २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांसाठी कर्करोग रुग्ण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यांतर्गत सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांसाठी ‘जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रम’ सन २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आढळून आलेल्या सर्व प्रकारच्या संशयीत कर्करोग रुग्णांसाठी शनिवार ७ मार्च २०२० रोजी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी १ यावेळेत सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांसाठी युनिवर्सल हेल्थ चेक-अप कॅम्प (कर्करोग रुग्ण तपासणी शिबीर) घेण्यात येणार आहे. या शिबिरास हैद्राबाद व नांदेड येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कर्करोग रुग्णांची तपासणी, आवश्यक तो उपचार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यांतर्गत सर्व प्रकारच्या संशयित कर्करोग स्त्री-पुरुष रुग्णांनी या कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.