Home मराठवाडा धाडसाने अव्हानांचा मुकाबला करा – मा. गुरूनाथराव कुरूडे

धाडसाने अव्हानांचा मुकाबला करा – मा. गुरूनाथराव कुरूडे

181

नांदेड , दि.२८ – ( राजेश भांगे ) –
कंधार येथील शिवाजी विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले . यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना नैराशाने कधीच धैय गाठले नाहि त्यासाठी हवे असते धाडस , धाडसाने आव्हानांचा मुकाबला केला कि यश हमखास प्राप्त होते. दहावीची परिक्षा आहे कसे होइल ? असा प्रश्न उपस्थित करित बसलो तर परिक्षेचा अभ्यास करून हि त्याचे लाभ होत नाहि . जे धैर्याने अव्हानांना सामोरे गेले ते जीवनात यशस्वी झाले . आपण हि धाडसाने अव्हानांचा मुकाबला करा परिक्षेच्या न्युनगंडातुन बाहेर पडा . दहावीची परिक्षा हि विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा पल्ला असते हा पल्ला पार केला कि करिअर करण्यास संधी उपलब्ध होते . कोणत्याही क्षेत्रात करिअर करावे पण त्यात आपली छाप सोडावे तसेच शाळा व गुरूजनांसह आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक करा असे कनमंत्र माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले. मुख्याध्यापक बसवंते सरांनी प्रास्तविकातुन विद्यार्थ्यांनी परिक्षेचे नियोजन कसे करायचे प्रश्न कसे कसे सोडवायचे या बाबत मार्गदर्शन केले तर अनिस खान सरांनी मनोगत व्यक्त केले व दहावीची विद्यार्थीनी शेख तबस्सुम गणी हिने “हमे स्कुल याद आयेगा ” हि कविता सादर करून आपली भावना व्यक्त केली. सुत्रसंचलन प्रदिप इंगोले सरांनी तर आभार प्रकट निखिल भांगे सरांनी केले .