Home जळगाव भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाज सेवक पुरस्कार डॉ. शरीफ बागवान यांना सन्मानित

भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाज सेवक पुरस्कार डॉ. शरीफ बागवान यांना सन्मानित

65
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव : मेहरुण येथील अमन रोटरी फौंडेशन आणि बागबान विकास फौंडेशनचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय जर्नलिस्ट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष व भारतीय पत्रकार संघ याचे महाराष्ट्र सचिव व सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरीफ बागवान यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फौंडेशन जळगाव या संस्थेने आपण करीत असलेल्या कार्याचा विविध सामाजिक उल्लेखनीय कार्याची योग्य दखल घेऊन २३/२/२०२० ला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आयोजित आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमात डॉ. शरीफ बागवान यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग. स. सोसायटी चे अध्यक्ष मनोज पाटील व महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाधयक्ष प्रवीण सपकाळे ,उद्योजक अनिल कासट ,शिक्षणाधिकारी देवांग साहित्यिक , अ. फ . भालेराव ,मनोहर पाटील व मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील ,शुभांगी बिरादे व संस्थांचे अध्यक्ष फिरोज शेख इत्यादी यांची उपस्थिती होती . हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .सर्व समाजातील लोकांनी या पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे विजय गुप्ता , अविनाश पाटील, अझहर शेख , राहुल राठोड, सुफियान अमजद, मुबिन राणानी, आबिद अली सैय्यद, नाज़िम बागवान,फरहान शरीफ, अमीन निसार,समीर सलीम,इरफान खान,अल्ताफ शेख मुझाहिद बागवान आदींनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करण्यात आले . हा पुरस्कार मिळाल्या ने मित्र व परिवाराने शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे .