Home महत्वाची बातमी येत्या शंभुजयंती पूर्वीच राजांना अभिवादन म्हणून सरकारने औरंगाबादचे  “छत्रपती संभाजीनगर” असे नामकरण...

येत्या शंभुजयंती पूर्वीच राजांना अभिवादन म्हणून सरकारने औरंगाबादचे  “छत्रपती संभाजीनगर” असे नामकरण करावे – शंभुसेना

218

पुणे – (प्रतिनिधि) – सध्या मोघली नावावरुन वादात सापडलेल्या वादग्रस्त औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्या संदर्भात संबंधित राजकीय पक्षातील लोकांनी फक्त एकमेकांवर शाब्दिक चिखल फेक न करता तसेच नामकरणा वरुन निव्वळ पोकळ गप्पा न मारता थेट नामांतरण करुनच आपला निवडणुकीतील जूना जाहिरनामा कृतीत आणावा असे कळकळीचे आवाहन शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी “मराठी राजभाषा दिन” व छत्रपती शंभुराजांच्या “धर्मवीर दिना” च्या पूर्वसंधेला केल्याने शंभुसेना संघटनेचे मराठी मातृभाषेवरील प्रेम व शंभुराजांवरील निष्ठा दिसून येत आहे.
सामाजिक संघटनेचे प्रमुख दिपकराजे शिर्के पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या तीन दशकापासून शहराच्या नामकरणाची मागणी होत असून या मागणीसाठी प्रथम शिवसेनेने अवघ्या महाराष्ट्रासह संबंधित जिल्ह्यात जोरदार आंदोलने केली होती मात्र सध्या तरी या आंदोलनाकडे त्यांच्याच पक्षातील लोकांनी गट- तट निर्माण केल्याने अनेक शिवसेना नेते सहभागी होताना दिसत नाही. आता तर खुद्द त्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना देखील हे नामकरणाचे घोंगडे भिजत का ठेवले असा प्रश्नही दिपकराजे शिर्के यांनी उपस्थित केला आहे.

सध्या शिवसेने पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेेेनाही आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल केली असल्याने शिवसेनेचे सर्व मुद्दे राजकीय धोरणातून हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल अवघ्या महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत असले तरी प्रत्यक्ष “संभाजीनगर” नामकरण करण्याबाबतच्या मागणी संदर्भात शिवसेनेला किती धारेवर धरते हे औत्सुक्याचे ठरेल, गेल्या काही वर्षापासून शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी करत आहे . मात्र मागील फडणवीस सरकारमधील सत्तेच्या ५ वर्षाच्या काळात असेल अथवा सध्याच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या माध्यमातूनही सत्तेत शिवसेना सहभागी असली तरी देखील औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याचा ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनसेला शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी हातात आयते कोलीतच सापडले आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी “संभाजीनगर” नाव करावे ही मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसेकडून मुंबईत कुर्ला एसटी डेपोमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुंबई-औरंगाबाद एसटी बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी “संभाजीनगर” नावाचे पोस्टर्स लावले होते.

म्हणूनच आता या नामांतराच्या राजकीय नौटंकीवर शंभुसेना संघटनेने शांतपणे प्रतिक्रया देत, सर्व राजकीय पक्षांनी नामकरणाचे ढोंगी राजकारण थांबवावे असे आवाहन केले आहे, तर औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबत अनेकांनी फडणवीस सरकारकडे वारंवार मागण्या केल्या होत्या, परंतु त्यावेळेस सरकारने मागणी मान्य केली नाही आणि आता सत्ता गेल्यावर विरोधी पक्षात असताना “संभाजीनगरचा” विषय काढणे हा निव्वळ ढोंगीपणा आहे अशी चर्चा शिव-शंभुभक्तांमधे होताना दिसत आहे. तरी संबंधित सरकारने राजकारण न करता लवकरात लवकर भारतातील सर्वच मोघली नावाच्या क्रूर- खुणा पुसून टाकत शहर, गाव, चौकांना असणारी मोघली व इंग्रजांची नावे बदलून राजे, महाराजे, सरदार, वीर मावळे यांची नावे द्यावीत अशी मागणी शंभुसेना संघटनेने केली आहे.