Home मुंबई आपल्या बहिणी वर बलात्कार करणाऱ्या नराधम भावास दहा वर्षां ची शिक्षा….!

आपल्या बहिणी वर बलात्कार करणाऱ्या नराधम भावास दहा वर्षां ची शिक्षा….!

37
0

अमीन शाह

मुंबई , दि. २५ :- बहिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आज, ठाणे न्यायालयानं चुलत भावाला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. २०१८मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
पीडितेवर चुलत भावानंच अत्याचार केले होते. या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. न्यायालयानं दोषीला दहा वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पीडितेसह तिची आई आणि आजोबा फितूर झाले होते. मात्र, तिची मैत्रीण, शिक्षक आणि डॉक्टरांनी दिलेल्या महत्वपूर्ण साक्षीनंतर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.

पीडितेनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मैत्रिणीला दिली होती. त्यानंतर त्या मैत्रिणीनं शिक्षिकेला माहिती दिली होती. २०१८मध्ये नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी आरोपीवर गुन्हा नोंदवला होता.

Unlimited Reseller Hosting