Home विदर्भ गाडगे बाबाच्या जन्मदिनी आगरगावच्या पारधी बेड्यावर राबविली स्वच्छता मोहीम.!

गाडगे बाबाच्या जन्मदिनी आगरगावच्या पारधी बेड्यावर राबविली स्वच्छता मोहीम.!

32
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २५ :- जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आगरगाव पारधी बेडा येथे गाडगे महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदर स्वच्छता मो हीम ही समाजिक कार्यकर्ते व पत्रकार अचिन पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली.मागील अनेक वर्षापासून पारधी बेड्यावर तेथील लोकांची सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होण्याच्या द्रुष्टिकोनातून विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही त्यांना मुलभूत सोयी- सुविधांपासून वंचित रहावे लागतं आहे.प्रशासनातील विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या दिसत नाहीत. अजूनही त्यांना वंचिताचे जिवन जगावे लागत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे मात्र या वस्तिकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.अशाही परिस्थितीत बेड्याच्या विकासासाठी अचिन पवार यांचे काम अखंडपणे चालू असते.
स्वच्छता अभियान हे त्यातील एका उपक्रमाचा भाग आहे. या स्वच्छता अभियानाप्रसंगी अचीन पवार,आकाश पवार, विकेन्द्र काळे,अजित पवार, विशाल पवार,अमित पवार,ऋषी चव्हाण, अमेश भोसले,अमिता पवार. जय काळे, स्नेहा पवार, रितिषा पवार, वेशली पवार, लक्ष्मी चव्हाण,विशाल थूल, सूरज फुसाटे,कपिल मुरारकर, विक्की थूल,पंकज बेलमारे, अमीन आदिंनी सहकार्य केले.

Unlimited Reseller Hosting