Home विदर्भ शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य करणारा कीर्तनकार व व्याख्याता.!

शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य करणारा कीर्तनकार व व्याख्याता.!

110

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार छत्रपती

मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय नाटिकेने दुमदुमले धामणगाव.

वर्धा – शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने धामणगाव तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामधे प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ला.मु.राठी विद्यामंदिर,सार्वजनिक शिव उत्सव समिति,श्रीगुरुदेव कोचिंग क्लास कावली ,विरुळ रोंघे, जूना धामणगाव, शहापुर या सर्व ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली व यामधे प्रमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत “मि छत्रपती शिवाजी बोलतोय” या एकपात्री प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण प्रा नीलेश मोहकार यांच्या द्वारे करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तरुण पिढीपर्यन्त पोहोचावे हा त्यांचा मानस आहे.धामणगाव तालुक्यातील कावली या ठिकाणी त्यांचा जन्म श्री मधुकरराव व स्व बेबीताई यांच्या पोटी झाला, शिक्षण BA ,Ded,MA (Eco -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 2 रा मेरिट) M.phil,सध्या अर्थशास्त्र विषयात शिवाजी महाविद्यालयात Ph.D चे कार्य सुरु असून 2014 मधे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळा तर्फे ग्रामगीताचार्य ही पदवी प्राप्त.वयाच्या 5 व्या वर्षापासून राष्ट्रसंताच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन बाल कीर्तनकार व नंतर व्याख्याते म्हणून ख्याती निर्माण केली.तालुक्यात गेल्या 12 वर्षापासून श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन व प्रमुख शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.राष्ट्रिय सेवा योजना शिबिरांमधे सक्रिय सहकार्य करीत असून श्रीगुरुदेव कोचिंग क्लास च्या माध्यमातून विद्यार्थ्याना सुसंस्कार व शिक्षणाचे धड़े देत आहेत.सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग व सोबतच मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय या एकपात्री नाटकाचे संपूर्ण जिल्हाभर सादरीकरण करीत असतात.छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांची भटकंती सुरु आहे.