Home जळगाव जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील राष्ट्रवादी यांच्या समोर रावेर तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ते...

जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील राष्ट्रवादी यांच्या समोर रावेर तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी केली मनमोकळी…..

323

रावेर (शरीफ शेख)

रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित रावेर तालुका राष्ट्रवादी आढावा बैठकीत जळगाव जिल्हा अध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली .यावेळी जळगाव जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां कल्पना ताई पाटील, मीना पाटील, सह रावेर माजी आमदार अरुण पाटील, सोपान पाटील, रमेश पाटील, निळकंठ चौधरी, विनोद पाटील सर, दिपक पाटील, सचिन पाटील, विलास ताठे,शे मेहमूद,शंशाक पाटील, देवानंद पाटील, लक्ष्मण मोपारी, पांडुरंग पाटील, विनोद पाटील, नारायण घोडके,
शेख सलीम, ईश्वर निळे, श्रीकांत चौधरी, माया बारी, सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते,
तसेच बैठकीचे प्रास्तविक निळकंठ चौधरी, तालुका अध्यक्ष यांनी केले, त्यात त्यांनी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर तहसीलदारांच्या कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना विधवा महिलांसाठी अनुदान, सह इतर अनुदान योजना चे धनादेश वाटप करण्यात यावेळी मला रावेर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मात्र सुचना वा या कार्यक्रमात बोलविण्यास आले नाही, किंवा विचारणा विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्या कडून झाली नाही,दुजाभावाची वागणूक मिळते
याविषयीची त्यांनी शिरीष चौधरी यांच्याविषयी ची जिल्हा अध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील राष्ट्रवादी यांच्या समोर व्यथा मांडली, शंशाक पाटील,तांदलवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ही मी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम प्रामाणिक करत आहेत, पणं मलाही रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी न्याय कधी ही मिळाला नाही, पदाच्या शर्यतीतून नेहमीच मला डावलून त्यांनी फक्त स्वतःच्या जवळपास चया कार्यकर्ते यांना पदे बहाल केली, आणि आताही तेच होते आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याच प्रमाणे देवानंद पाटील,बलवाडी,माया बारी,शेख मेहमूद यांनी या बाबीला दुजोरा दिला, याच दरम्यान खाली बैठकीतील कार्यकर्ते मध्ये हीच कुरबुर सुरू होती, यांनतर सोपान पाटील यांनी पक्ष संघटनेसाठी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी जनमानसात जाण्याची विनंती केली, तर माजी आमदार अरुण पाटील यांनी जे झाले ते होवू द्या, पण मी मात्र माझ्या स्वखर्चाने गाड्या करून कोणी येवोत अथवा ना येवो मी जे माझ्या सोबत येतील त्यांना घेवून महीन्यानंंतर पक्ष संघटनेसाठी व पक्ष बांधणीसाठी मी स्वतः जनतेच्या दारापर्यंत जाईल अशी ग्वाही माजी आमदार अरुण पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील यांना दिली,
याच वेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या कल्पना पाटील, यांनी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले, व पक्ष बांधणी किती गरजेचे आहे,पक्ष संघटना मजबूत व विस्ताराने करण्यासाठी कडक शब्दांत डोस दिला आहे,

यावेळी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विलास ताठे, यांनी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची पक्ष संघटनेसाठी व बांधणी ची कामगिरी हि फक्त कागदावरच राहील, कारणं हे सर्व सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्ते यांना जवळ करत नाहीत, त्याविषयी आपुलकी, जिव्हाळा प्रस्थापित करण्यासाठी सांधे प्रयत्न करीत नाही, त्याविषयी विचारपूस, अडचणी दूर करण्यासाठी तसदी घेत नाहीत, मग कशी काय कार्यकर्ते संघटन वाढेल,कशी पक्ष बांधणी होईल, हे नेते फक्त रावेर ला बंद खोलीत आपल्या जवळची दोन तीन जण घेऊन पक्षांचे आपल्यालाच सोयीचे काम करत बसतात, यांना पक्ष संघटना मजबूत व विस्ताराविषयी काही घेणं देणं नाही, फक्त स्वतःच्या माणसाला चांगले पद, समिती स्थान, तर आता सत्ता आल्यानंतर त्यांचाही आपल्या कसा फायदा करून घेता येईल याविषयीची उत्सुकता यांच्यात दिसते,पण यासंधीचे सोनं सर्व सामान्य माणसाला, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न करीत नाहीत, म्हणून जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात रस्त्यावर उतरले, ज्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला, निवेदन देवून जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला, जनसंपर्क ठेवलाय त्यांना घेवून च आता सत्तेची सूत्रे यांत रावेर तालुका समित्या स्थापन मध्ये सहभागी करावे, मग तालुका राष्ट्रवादी समन्वय समिती असो वा इतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निगडीत कमेटी असो, सर्वांसाठी समान संधी उपलब्ध रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी करून द्यावी, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच अष्टप्रधान मंडळातील सदस्य याचं धर्तीवर जवळपास
देशांचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री शरद चंद्र पवार यांनाही अभिप्रेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या लोकांना रावेर राष्ट्रवादी तालुका पक्षात सामावून घेतले पाहिजे, व माजी आमदार अरुण पाटील सह, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला सोशल मीडिया अँक्टिव्हिटीत ठेवून, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य, विचार, ध्येय आणि धोरणे जनते पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे पक्षाच्या नावलौकिक वाढण्यास मदत होईल,
असे रोखठोक मत विलास ताठे यांनी मांडले,
तसेच बैठकीचे अध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील यांनी यावेळी सर्व उपस्थित नेते, कार्यकर्ते, व समस्त पदाधिकारी यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली,व त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ह्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर व प्रयत्नशील आहे, कोणाला केव्हाही माझं दार उघडे ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटना मजबूत व विस्ताराविषयी नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी अजून ही मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेसाठी व बांधणी ची कामगिरी बजावली पाहिजे, व युवक, महिला, सामाजिक न्याय, किसान सभा,सह सर्व च तालुका कमेटी ह्या सार्वजनिक मिंटीगचे आयोजन करून मी स्वतः या कार्यक्रमात उपस्थितीत राहून पुढिल कार्यकारिणी जाहीर करू, तुर्त ह्या कमेंटयांना बरखास्ती नाही, तसेच महाविकास आघाडीचा नवा फारमुला ज्या ठिकाणी स्थानिक आमदार ज्या पक्षाचा आहे, त्यांना ६० टक्के तर बाकीच्या दोन पक्षांना २०,२० टक्के अनुक्रमे महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार ठरला आहे, असे ठळकपणे नमूद केले.
या बैठकीत राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष सावदा, , प्रल्हाद बोंडे, सुनिल कोंडे
ओबीसी सेल रावेर तालुका अध्यक्ष, सामाजिक न्याय रावेर तालुका अध्यक्ष समाधान साबळे, यांची गैरहजेरी कुतूहल निर्माण करणारी होती.