Home विदर्भ दादासाहेब गवई इंग्लिश मिडीयम स्कुल वार्षिक स्नेह संमेलन थाटात संपन्न

दादासाहेब गवई इंग्लिश मिडीयम स्कुल वार्षिक स्नेह संमेलन थाटात संपन्न

31
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १८ :- पार्वती नगर उमरसरा येथील दादासाहेब गवई इंग्लिश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन 14 फेब्रुवारी रोजी अतिशय उत्साही वातावरणात थाटाने संपन्न झाले.

स्नेह संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धमेंद्र मानवतकर, डि. वाय. एस. पी. माधुरी बावीस्कर, सुप्रसिद्ध डॉ. धनंजय खोलगडे, डॉ. अंजली गवार्ले आदि मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या मुख्याध्यापिका वर्षा मानवतकर यांनी केले. दादासाहेब गवई इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह संमेलना निमित्त विविध स्पर्धेत सहभाग घेऊन नृत्य स्पर्धा, सोलो डान्स, नाटिका आदि स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन करुन आपल्या कला व गुणांचे प्रस्तुतीकरण केले. बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उद्घाटना प्रसंगी डी. वाय. एस. पी. माधुरी बावीस्कर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाची मुक्तकंठाने प्रशंसा करुन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळा व शाळेचे शिक्षक घेत असलेल्या परिश्रमा बद्दल मुक्तकंठाने प्रशंसा केली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष धमेंद्र मानवतकर यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य निर्माण करण्यासाठी सदैव संस्था तत्पर राहील असे अभिवचन दिले. हे वार्षिक स्नेह संमेलन शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा मानवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रिती वानखडे व आभार प्रदर्शन सिमा श्रीराव यांनी केले. वार्षिक स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दादासाहेब गवई इंग्लिश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दादासाहेब गवई इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नशिल होते.

Unlimited Reseller Hosting