Home मराठवाडा स्थानिक गुन्हे शाखेने केले अट्टल दुचाकि चोरांना जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेने केले अट्टल दुचाकि चोरांना जेरबंद

70
0

नांदेड , दि.१८ ; (राजेश भांगे ) शहर व जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी या चोरट्यांचा छडा लावण्यासाठी कंबर कसली आहे. मागील पंधरा दिवसात दोन मोठ्या कारवायानंतर पुन्हा तिसरी कारवाई करुन तीन चोरट्यांकडून १५ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी रविवारी (ता. १६) मुखेड तालुक्यातील जांब परिसरात केली.

दुचाकी व मोबाईल चोरांनी पोलिसांची झोप उडवून दिली आहे. हे चोरटे नांदेड शहर व परिसरात गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून दुचाकी चोरत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे वाहनधारक भयभीत झाले असल्याने शहरात वाहन कुठे लावावे या तणावात वाहनधाक वावरत आहेत. अनेक घटना तर अंगणात किंवा दुकानासमोर लावलेल्या दुचाकी चोरील्या गेल्या आहेत.वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मागील पंधर दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळत आहेत. तीन कारवायामध्ये जवळपास ७० हुन अधीक चोरीला गेलेल्या दुचाकी जप्त केल्या असून काही अट्टल चोरटे जेरबंद केले आहे.

*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांनी सर्वच ठाणेदारांना सक्त सुचना दिल्या आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या सर्वच अधिकाऱ्यांना सुचना देऊन दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणून जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज केले आहे. यावरून फौजदार गोविंद केंद्रे यांनी आपले सहकारी भानुदास वडजे, मारोती तेलंग, गणेश धुमाळ, दशरथ जांभळीकर, तानाजी येळगे, बालाजी तेलंग यांना सोबत घेऊन मुखेड तालुक्यात गस्त घातली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुखेड शहरातील वेताळगल्ली परिसरातून गंगोजी साईनाथ मंगनाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यावरून प्रदीप उमाटे व एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन तिघांची कसुन चौकशी केली. यावेळी हे गंगोजी मंगनाळे हा ह्या दोघांना गाडीच्या किल्ल्या व पैसे पुरवत असे. या तिघेजन जांब (ता. मुखेड) येथील एका दुचाकी मेकानिकच्या शेतातून पोलिसांनी सहा लाखाच्या पंधरा विविध कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या.

*दोन चोरट्यांना पोलिस कोठडी*

हे चोरटे लातूर, नायगाव, मुखेड व नांदेड शहरातून दुचाकी गाड्या चोरत असुन या चोरलेल्या गाड्या शेतात ठेवून तेथून ते काळ्याबाजारात विकत असल्याची माहिती पोलिसांंनी सांगितली. यातील गंगोजी मंगनाळे व प्रदीप उमाटे याला सात दुचाकीसह नायगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. तर विधीसंघर्ष बालक आणि आठ दुचाकी रामतिर्थ पोलिसांच्या स्वाधीन केले. यातील दोन चोरट्यांनी न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. या चोरट्यांकडून अजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.