Home विदर्भ देवळी मध्ये बेमुदत आंदोलन.!

देवळी मध्ये बेमुदत आंदोलन.!

113

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १८ :- प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना कृती समिती, देवळी च्या वतीने आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पासून देवळी करांनी केंद्र शासनाच्या निधीच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई घरकुल योजना चे लाभार्थी केंद्र सरकारच्या निधी वाचून अडचणीत आले आहे. या दोन्ही योजने मध्ये राज्यशासनाच्या वतीने निधीची तरतूद नगर परिषद स्तरावर झालेली असुन केंद्र सरकारच्या निधी पासून देवळी कर वंचित आहेत. लवकरात लवकर केंद्र शासनाने उर्वरित निधीची तरतूद करावी तसे निवेदन सादर करण्यात आले आहे, जोपर्यंत केंद्र शासनाचा निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत आंदोलने सुरू राहील असा इशाराही देण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना चे लाभार्थी आणि देवळी येथील सामाजीक व राजकिय संघटनांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना कृती समिती देवळी’ अशी समिती गठीत करून वरील योजनेच्या लाभार्थ्यांच्या हक्कासाठी ही समिती बेमुदत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. या वेळी आंदोलकानी आपल्या भावना व्यक्त करतांना नगर परिषद प्रशासनाने आमच्या मागण्या त्वरित केंद्र सरकार कडे पाठवाव्यात आणि आमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी कृती समिती पाठपुरावा करीत आहे असे सांगितले. नगर परिषद देवळी च्या समोर पोलीस स्टेशन रोड, पुलगाव नाका देवळी येथे आंदोलन स्थळी बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला देवळीच्या सामाजिक, राजकिय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पत्रकार परिषदेच्या संघटनांनी पाठिंबा दिला असून किरण ठाकरे, गौतमराव पोपटकर, कृष्णाजी शेंडे, रमेश जी धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. बेमुदत सुरू झालेले आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.