Home मराठवाडा मुकबधीर तरुणीवर बलात्कार गुन्हा दाखल , “सर्वत्र संतापाची लाट”

मुकबधीर तरुणीवर बलात्कार गुन्हा दाखल , “सर्वत्र संतापाची लाट”

20
0

सययद नजाकत

जालना , दि. १७ :- पंचवीस वर्षीय मूकबधिर तरुणीच्या असहायतेचा फायदा घेऊन जबरदस्तीने संभोग करून गर्भवती केल्याप्रकरणी अंबड पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मौजे खेडगाव तालुका अंबड येथील 70 वर्षे इसमाने फिर्याद दिली आहे की, स्वतःची 25 वर्षीय मतिमंद मुलगी असून, घरी जास्त प्रमाणात त्रास देऊ लागल्या कारणाने, 5-2-2020 रोजी मेंटल हॉस्पिटल येरवडा पुणे येथे उपचार करण्यासाठी घेऊन गेलो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या दरम्यान मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, सदरील मुलगीही गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे रेफर केले, सदरील मुलगीही मतिमंद असल्याकारणाने तिचा गर्भपात करण्यात आला.

सदरील मतिमंद मुलगी आपल्या मूळगावी शेतात घराच्या आसपास फिरत असताना अज्ञात व्यक्तीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जबरदस्तीने संभोग करून गर्भवती राहिल्या कारणाने फिर्यादीने अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी कलम 376(2)जे, 376(2)एल भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया करत आहे

Unlimited Reseller Hosting