Home मराठवाडा आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवण कधीही चांगल – दादाराव मुन

आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवण कधीही चांगल – दादाराव मुन

50
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १३ :- आजच्या तरूणाने जीवन जगत असतांना व्यसनाच्या आहारी जावून आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपविने कधीही चांगले असल्याचे मत जागृती व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दादाराव मुन यानी व्यक्त केले.
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील इसापुर येथे श्री.बि. समाजकार्य महाविद्यालय देवळी च्या वतीने व्यसन मुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या कार्य क्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आजचा तरुण चांगले जीवन जगण्यासाठी वाटचाल करीत असतांनाच मग व्यसन करून आयुष्य बिघडवण्याच्या मार्गावर तरूणाने का जावे ? जीवन कोणाला नको आहे. माञ
तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेलेली दिसते. मग तो कॉलेज मधला असो की अशिक्षित असो या तरुणांना व्यसन मुक्त करण्यासाठी इसापूर येथे पथनाट्य करून जनजागृती करण्यात आली.
श्री. बि. समाजकार्य महाविद्यालय देवळीच्या विद्द्यार्थ्यांचा क्षेत्रकार्यांअंतर्गत इसापूर येथे 10 फेबु. रोजी व्यसन मुक्ति जनजागृती या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यसन मुक्ति जनजागृती या विषयाचे मार्गदर्शक मा. श्री. दादाराव मून, प्रकल्प अधिकारी, जागृती व्यसन मुक्ति केंद्र देवळी उपस्थित होते. इसापूरच्या सरपंच सौ. प्राणिता आंबटकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .बी .के समाजकार्य महाविद्यालय देवळीचे कार्यकारी प्राचार्य श्री. सुनिल सुर्वे मंचकावर उपस्थित होते. प्रा. अंकित गिरमकर, प्रा . आरती तुंबडे, गणेश शेंडे व नरेश ढोकणे हे कार्यक्रमास उपस्थीत होते.
व्यसनावर बोलतांना त्यांनी नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी/निद्रा येणे, शरीराचे अवयव शिथिल पडणे, ग्लानी येणे, विचारशक्तिचा ऱ्हास इत्यादी प्रकार घडतात. याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते. या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते. अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय नक्की लागते असे उदगार मार्गदर्शक मा. दादारावजी मून यांनी काढले.
अध्यक्षीय भाषनात सुर्वे यांनी व्यसनमुक्ति काळाची असे संगितले. तर अंकित गिरमकर यांनी व्यसनामुळे आयुष्य खराब होते असे सांगितले . नरेश ढोकणे यांनी इसापूर मध्ये खूप कमी प्रमाणात व्यसन करणारे लोक आहेत आणि लवकरच इसापूर गाव व्यसन मुक्त होईल असे संगितले. गणेश शेंडे यांनी लहान- लहान मुलांना देखील मोबाइल, दारू, सिगारेट सारखे व्यसन जळलेले आहे आणि आयोग्यासाठी हानीकारक आहे संगितले. त्यानंतर समाजकार्याचे विध्यार्थी अभय चौधरी यांनी महिला ही घरची लक्ष्मी आहे. त्यांनी व्यसन करू नये असे संगितले. निलेश दारुंडे यांनी आताचा तरुणवर्गाला मोबाइलच वेगळच व्यसन लागलेले , आणि व्यसनाधीन व्यक्ति त्याच्या परिवारासोबत समाजावर सुद्धा ओझं बनून जातो असे सांगितलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ति अमृतकर व आभार प्रदर्शन सागर डगवार यांनी मानले. तसेच प्रीतम लोहे, लोचना पाचपोर, रविना येरमे, सचिन ठाकरे, शुभम होरे, अमोल काकडे. धिरज नाईक, किशोर रुद्रकार, नितिन बडे, श्याम भगभुजे, प्रणय वासेकर, गावातील गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting