Home यवतमाळ सामाजिक परिवर्तनाच्या नृत्यांनी गाजला समता पर्वाचा दुसरा दिवस, कथक, योगा, लेझीम, सोलो...

सामाजिक परिवर्तनाच्या नृत्यांनी गाजला समता पर्वाचा दुसरा दिवस, कथक, योगा, लेझीम, सोलो डान्स व सामूहिक वृत्तांनी वयाचे भान विसरले स्पर्धक

80

यवतमाळ  – महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित समता पर्व 2026 अंतर्गत दुसरा दिवस महिलांच्या नृत्य स्पर्धेने अक्षरशः रंगून गेला. दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या या भव्य उपक्रमात दुसऱ्या दिवशी सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या विविध नृत्य प्रकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कथक, योगा, लेझीम, सोलो डान्स तसेच सामूहिक सादरीकरणांच्या माध्यमातून स्पर्धकांनी कला आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम घडवून आणला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत 14 वर्षांपासून ते 80 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वयाची मर्यादा ओलांडली आणि “कला हीच खरी ओळख” याची प्रचिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोगाने झाली, ज्याने उपस्थितांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रमोदिनी रामटेके यांनी जबाबदारी सांभाळली, तर उद्घाटक म्हणून हेमलता वैद्य उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मंजुषा बोरगमवार, सोनाली रामटेके, गंगा रंगारी, माधुरी वाळके, पुष्पा कावळे, प्रा. प्रिया वाकडे, नंदिनी शहारे, ज्योती जीवने, पल्लवी कांबळे, शुभांगी मालखेडे, मनिषा डोंगरे, वृंदा कांबळे, सायली गुरदे, कुसुम देवतळे, वनमाला वंजारी, मिरा वीर, प्रतिभा दातार, जोसना गौरकार, विशाखा डोगरे व देवांगना मेश्राम यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. वैशाली हिरे यांनी केले, भूमिका सुनीता कापशीकर यांनी मांडली, तर सूत्रसंचालन कुशल रंगारी यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन रेखा गुजर यांनी केले.

या यशस्वी आयोजनासाठी वृंदा उके, भागीरथी गुरदे, विनीता राऊत, भाविका रामटेके, समता दुपारे, हर्षा बोडखे, कांचन जुमनाके, नंदा वाकोडे, सुनीता पोपटकर आणि विशाखा लिहीतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. वीरा मांडवकर, अमित राऊत आणि अ‍ॅड. वैशाली हिरे यांनी केले.समता पर्वाचा हा दुसरा दिवस सामाजिक संदेश, कला आणि उत्साह यांचा संगम ठरत, उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून गेला.